आजच्या काळात भारतामध्ये इतकी बेरोजगारी आहे की त्याबाबत रोज काही ना काही बातमी समोर येतच असते. सर्वच स्टार्टअप्समध्ये कपातीच्या बातम्या समोर येतात. दरम्यान, एका स्टार्टअप संस्थापकाने ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये रिक्त जागांसाठी भरती काढल्यानंतर अल्पावधीतच भरपूर अर्ज आले. अवघ्या २ दिवसात कंपनीला ३००० अर्ज मिळाले. आता या ट्विटर पोस्टवरून वाद सुरू झाला आहे. लोक रिप्लाय म्हणून अनेक प्रकारचे ट्विट करत आहेत. अनेक लोक या ट्विटचे प्रिंट शॉट्स घेऊन ट्विटरवर शेअर करत आहेत.

आधी काय ट्विट केले होते ते जाणून घ्या
स्प्रिंगवर्कचे संस्थापक आणि सीईओ कार्तिक मंडाविले यांनी सांगितले की, ”त्यांच्या वेबसाइटवरून रिक्त जागा काढून टाकल्यानंतर केवळ ४८ तासांत ३००० अर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी सांगितले की, त्यांना एका महिन्यात सुमारे १२५०० अर्ज मिळाले आहेत. यावर त्यांनी नोकरीच्या बाजाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ”

हेही वाचा – फक्त मोबाईलसाठी चक्क १०० फुट उंचावरुन कोसळत्या धबधब्यामध्ये तरुणीने मारली उडी; पाहा थरारक Video

कोणत्या पदासाठी निघाली भरती?
कंपनीने काढलेल्या रिक्त जागा वेगवेगळ्या विभागांतर्गत काढल्या आहेत. या इंटरनल प्रॉडक्शन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअरसह अन्य काही पदांसाठी भरती होणार आहेत. यासोबतच संस्थापक ऑफिससाठी काही रिक्त पदेही भरण्यात येणार आहे.

कामात विशेष काय नोकरीत?
या नोकरीसाठी इतके अर्ज येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कंपनीने हे वर्क फ्रॉम होम ठेवले आहे. ही नोकरी कायमस्वरूपी रिमोट आहे असे जॉब पोस्टमध्ये लिहिले आहे. अशा परिस्थितीत, अधिकाधिक लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केले आहेत, कारण त्यांना यासाठी घर सोडण्याची गरज नाही. हे काम गृहिणी देखील करू शकतात, ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडता येत नाही किंवा घरापासून दूर जाऊन काम करता येत नाही.

हेही वाचा – ”तुम्ही स्वत: कधी वेळेवर…”, उशीरा ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्याला नोटीस पाठवणे अधिकऱ्याला पडलं महागात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून लोकांनी केले इतके अर्ज
या नोकरीच्या रिक्त जागेवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की जर त्यांना घरून काम करण्याचा पर्याय मिळाला तर लोकांना ते अधिक आवडते. त्यामुळे लोकांना चांगला वर्क लाईफ बॅलन्स मिळते. बहुतेक लोक कमी पैशातही वर्क फ्रॉम होम जॉबसाठी तयार होतात, कारण त्यांना घरापासून दूर जावे लागत नाही. यासोबतच ऑफिसला ये-जा करण्याचा त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतात.