निसर्ग हा माणसाचा मित्र आहे असे म्हणतात कारण निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे. निसर्गाशिवाय मानवीजीवन अशक्य आहे. आपल्या आसपास असलेली प्रत्येक गोष्ट या निसर्गाची देण आहे. पण मानवाला याचा विसर पडला आहे. जागतिक पातळीवर तापमान वाढत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सरकार आणि निसर्गप्रेमीकडून नेहमी जागरुकता निर्माण केली जाते. पण वैयक्तिक पातळीवर निसर्गाच्या संवर्धनाचा प्रयत्न करणारे फार मोजके लोक आहेत. अशाच एका निसर्गप्रेमींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

वाढत्या प्रदुषणामुळे मोकळा श्वास घेणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून रिक्षाचालकाने हटके जुगाड शोधून काढला आहे. या रिक्षाचालकाने चक्क रिक्षामध्येच ऑक्सिजनची सोय केली आहे. त्याने लहान कुंड्यामध्ये विविध प्रकारची रोपे लावली दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ एका ग्राहकाने पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ही रिक्षा गणेश नाणेकर काकांची आहे. पिंपरी चिंचवड मधील राहटणी येथे काल रात्रीच्या वेळेस बाहेर फिरायला गेले असताना काका आणि त्यांची हटके अशी रिक्षा दिसली. काकांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना शुद्द ऑक्सिजन मिळवण्यासाठी ही युक्ती लढवली आहे. त्यामुळे प्रवाशांना शुद्ध असा ऑक्सिजन तिथ लावलेल्या रोपाच्या माध्यमातून मिळतो.” गणेश नाणेकर(nanekar58 ) या नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा – माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षावाल्या काकांनी निसर्गाच्या संवर्धनामध्ये खारीचा वाटा उचलला आहे. नेटकऱ्यांनी काकांची ही कल्पना प्रचंड आवडली आहे. अनेक जण काकांच्या प्रयत्नाचे कौतूक करत आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंच करत म्हटले, “किती सुंदर दादा” दुसऱ्याने म्हटले, खुप सुंदर दादा, मलाही झाडे लावायला फार आवडते. तिसरा म्हणाला,”सलाम” चौथ्याने लिहिले, दादा नाद आवडला खूप म्हणजे खूप आवडला. शब्दात सांगता येणार नाही. तुम्हाला सलाम दादा” पाचव्याने लिहिले की, “अप्रतिम कामगिरी”