तुम्ही भारताचा नकाशा पाहिला आहे का? तुम्हाला भारताचा नकाशा कसा दिसतो असा प्रश्न विचारता तर तुम्ही लगेच उत्तर द्याल.. अर्थात हो. पण भारताचा नकाशा काढून दाखवता येईल का असा प्रश्न विचारला तर? कदाचित तुमच्यापैकी काही जणांना उत्तम प्रकारे भारताचा नकाशा काढता येत असेल पण अजूनही असे अनेक लोक आहे ज्यांना भारताचा नकाशा व्यवस्थित काढता येत नाही.

चिमुकल्याने चुटकीसरशी रेखाटला भारताचा नकाशा

शाळेत भूगोलाच्या तासाला शिक्षक जेव्हा वर्गात नकाशा लावायचे तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी तो नकाशा पाहिला असेल. पण तुम्ही कधी भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला आहे का? केल असेल तर तुम्हालाही माहित असेल की भारताचा नकाशा काढणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही पण एका चिमुकल्याने चुटकी सरशी भारताचा नकाशा रेखाटला आहे. भारताचा नकाशा कसा काढायचा याची ट्रिक चिमुकल्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा – वृद्धाचे संतापजनक कृत्य! दुकानात खरेदी करणाऱ्या महिलेबरोबर घडली धक्कादायक घटना, Video Viral

भारताचा नकाशा काढण्याची सांगितली ट्रिक

आजकालची मुलं प्रचंड हुशार आहेत. कोणतीही गोष्ट पटकन आत्मसात करतात. अशाच एका हुशार चिमुकल्याने आपले चित्रकलेचे कौशल्य दाखवणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर pranavs_alley नावाच्या पेजावर शेअर केला आहे. प्रणय फक्त चित्र काढत नाही तर सोप्या ट्रिक वापरून वेगवेगळी चित्र कशी काढावी हे देखील शिकवतो. व्हिडीओमध्ये प्रणय त्याच्या छोट्याश्या फळ्यावर प्रथम एक्स(x), जे (J), के(K), व्ही (V) ही इंग्रजी अक्षरे काढतोय . यामध्ये अक्स अक्षर तो फळ्यावर वरच्या बाजूला काढतो त्याच्या बरोबर समोर व्हि अक्षर काढतो. त्यानंत फळ्याच्या मधोमध तो जे आणि के हे इंग्रजी अक्षरे समोरोसमोर काढतो. त्यानंतर एक्स अक्षरापासून खडूने नकाशा काढण्यास सुरुवात करतो, जे, व्ही आणि के भोवती खडू फिरवून तो पुन्हा एक्स अक्षरापर्यंत नेतो आणि सुंदर भारताचा नकाशा रेखाटतो. या ट्रिकमुळे भारताचा नकाशा लहान मुलांनी सहज काढता येईल.

हेही वाचा – पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत! शिमला, कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटी, हिमाचलमधील विध्वंसाचे Video पाहून अंगावर येईल काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, नकाशा काढण्याची सोपी ट्रिक” प्रणयचे कौशल्य पाहून नेटकरी खूश झाले आहे. अनेकांनी कमेंट करून त्याचे कौतूक केले. अप्रतिम, सुंदार, वाह, उत्तम! अशा प्रतिक्रिया देत अनेकंनी कौतूक केले. तर एकाने लिहिले की, “मुलगा किती हुशार आहे त्याच्या पालकांसाठी टाळ्या”