scorecardresearch

Premium

तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो? टिम कुक यांनी सांगितले पात्रता निकष, मुलाखतीत फक्त..

Tim Cook Tells Job Selection Criteria: Apple मध्ये जॉबची संधी कशी मिळवायची याचं उत्तर आता स्वतः Apple चे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान दिले आहे

How To Get A Job At Apple Even If You Dont Know Coding Tim Cook Tells Three Major Selection Criteria For Job Roles Positions
Apple चे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीत नोकरी कशी मिळवावी याची माहिती दिली आहे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

How To Get A Job At Apple Tells Tim Cook: Apple, गूगल, फेसबुक, अशा काही मोठ्या संस्थांमध्ये नोकरीची संधी हे अनेकांचे स्वप्न असते. लाखो लोकं यासाठी प्रयत्न करत असतात, मुलाखतीच्या संधी शोधत असतात. पण नेमकी ही संधी कशी मिळवायची याचं उत्तर आता स्वतः Apple चे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान दिले आहे. गायक-गीतकार दुआ लीपाने आयोजित केलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कुक यांनी Apple मध्ये नोकरीची संधी मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांमध्ये कोणते गुण असायला हवेत हे सांगितले आहे.

ऍपल कर्मचार्‍यांमध्ये काय साम्य आहे याबद्दल बोलताना कुक म्हणाले की “एक + एक = तीन” असा त्यांचा सर्वांचा विश्वास आहे. तुमच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी पुढे येण्यासाठी त्याच पद्धतीच्या टीम सदस्यांसह काम करण्याची तयारी असायला हवी. तुमची एखादी कल्पना व माझी एखादी कल्पना ही एकत्रित असल्यास कोणाच्याही एकट्याच्या कल्पनांपेक्षा चांगली असू शकते. याशिवाय एक गुण प्रत्येकामध्ये असायलाच हवा तो म्हणजे मदत करण्याची वृत्ती. टीम चे सदस्य म्हणून ते अन्य सदस्यांना खरोखरच मदत करू शकतात का किंवा इच्छितात का हे महत्त्वाचे असते.

R Ashwin Wife Prithi Pens Emotional post
IND vs ENG : ‘५०० ते ५०१ विकेट्स दरम्यान आमच्या आयुष्यात…’ अश्विनच्या कामगिरीबद्दल पत्नी प्रीतीची भावनिक पोस्ट
dharmendra on daughter esha and bharat takhtani divorce
लेक ईशा देओलच्या घटस्फोटावर धर्मेंद्र यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या दोघांनी…”
sandeep-reddy-vanga-family-reaction
संदीप रेड्डी वांगाच्या सात वर्षाच्या मुलाला आवडला ‘अ‍ॅनिमल’मधील ‘हा’ सीन व पत्नीनेही दिली प्रतिक्रिया; दिग्दर्शकाचा खुलासा
Ladakh shepherds stand firm against Chinese troops 1
VIDEO : भारतीय हद्दीतून चीनने मेंढपाळांना हुसकावलं? काँग्रेसची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “मोदींनी २०२० मध्ये…”

ऍपलसह काम करण्यासाठी कोणती पदवी किंवा कोडिंग येणे आवश्यक आहे का याविषयी माहिती देताना कुक यांनी सांगितले की, “आम्ही ‘सर्व क्षेत्रातील’ लोकांना कामावर घेतले आहे, त्यात महाविद्यालयीन पदवी, पदव्युत्तर पदवी नसलेल्या लोकांचाही समावेश आहे. कोडिंग हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे कौशल्य असले तरी ऍपलने अशाही व्यक्तींना कामावर घेतले आहे ज्यांच्याकडे कोडिंगचे कौशल्य नाही किंवा ते त्यांच्या दैनंदिन कामात नियमितपणे कोडिंगचा वापर करत नाहीत.

हे ही वाचा<<भारतात पहिली वहिली ड्रायव्हरलेस टॅक्सी सेवा? Video पाहून नेटकरी झाले थक्क, पण महिलेने शेअर केलेला अनुभव..

थोडक्यात सांगायचे तर, कूक यांच्या माहितीनुसार ऍपलमध्ये काम करणारी व्यक्ती ही जिज्ञासू हवी, जे प्रश्न विचारण्यास घाबरत नाहीत. सर्जनशीलता आणि टीमचा भाग म्हणून काम करू शकणाऱ्या व्यक्तीला नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to get a job at apple even if you dont know coding tim cook tells three major selection criteria for job roles positions svs

First published on: 27-11-2023 at 16:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×