Viral post: आजच्या घडीला तरुणांसमोर सर्वांत मोठा प्रश्न आहे, तो म्हणजेच रोजगाराचा. देशाची लोकसंख्या बघता रोजगार फारच कमी आहेत.तरुणाईमध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताबरोबरच आता इतर देशांमध्येही बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक राजकीय पक्ष बेरोजगारी हटविण्याच्या नावाखाली आपली राजकीय पोळी शेकतात. परंतु, बेरोजगार तरुणांसाठी काही करताना कोणीही दिसत नाही. अशातच एका लॉँड्रीच्या बाहेर लागलेलं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांनी या लॉँड्री मालकाचं कौतुक केलं आहे.
बेरोजगार तरुणांसाठी अनोखी ऑफर –
सध्या व्हायरल झालेली ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. एका लॉँड्रीबाहेर लावलेल्या या पोस्टरवर “जर तुम्ही बेरोजगार असाल आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला स्वच्छ कपडे हवे असल्यास आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देऊ असं लिहलं आहे. हा लॉँड्री मालक बेरोजगार लोकांना करत असलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. “जेव्हा वेळ कठीण असते, तेव्हा आम्ही तुम्हाला नेहमी मदत करू असंही पुढे लिहिले आहे.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – Video: भैया टू सैया! जोडप्याची अनोखी ‘लव्ह स्टोरी’ सोशल मीडियावर व्हायरल
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या लॉँड्री चालकानं नेटकऱ्यांची मन जिंकून घेतली आहेत. यातील एका युजरने माणूसकी अजूनही जिवंत आहे अशी प्रतिक्रिया पोस्टवर दिली आहे.