कर्नाटकमधील कोप्पल येथे एक आगळावेगळा गृहप्रवेश सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यातील काही फोटो सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतरही मंगलप्रसंगी तिची सोबत असावी म्हणून एका व्यक्तीने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी पत्नीचा अगदी खराखुरा वाटावा असा पुतळा तयार करुन घेतला आहे. या सोहळ्यातील फोटो एबीपी न्यूजच्या दक्षिण भारतातील प्रतिनिधी असणाऱ्या पिंकी राजपुरोहित यांनी ट्विटवरुन शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकमधील कोप्पलमधील श्रीनिवास मूर्ति यांच्या घरी हा आगळावेगळा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील श्रीनिवास आणि त्यांच्य पत्नीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. श्रीनिवास यांच्याबाजूला गुलाबी साडीमध्ये त्यांची पत्नी बसलेली दिसत आहे. मात्र फोटोंमध्ये दिसणाऱ्या श्रीनिवास यांच्या पत्नीचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या फोटोंबद्दल चर्चा सुरु आहे. खरं तर या फोटोंमध्ये श्रीनिवास यांच्या बाजूला त्यांच्या पत्नीचा लाइफ साइज पुतळा आहे. हे फोटो शेअर करताना पिंकी यांनी, “कर्नाटकमधील कोप्पलमध्ये राहणाऱ्या श्रीनिवास मूर्ति यांच्या गृहप्रवेश सोहळ्याचे फोटो. गुलाबी रंगाच्या साडीतील माहिला नसून ती एक पुतळा आहे. श्रीनिवास यांच्या पत्नीचा तीन वर्षांपूर्वी एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उणीव भासू नये म्हणून श्रीनिवास यांनी पत्नीचा पुतळा बनवून घेतला,” अशी कॅप्शन दिली आहे.

या फोटोंमधील श्रीनिवास यांच्या पत्नीचा पुतळा इतका हुबेहुब आणि छान पद्धतीने साकारण्यात आला आहे की फोटो पाहून खरीखुरी व्यक्तीच श्रीनिवास यांच्या शेजरी बसल्यासारखे वाटते. हा पुतळा आहे असं सांगितल्याशिवाय यावर विश्वास बसत नाही.

या फोटोखाली एका फॉलोअरने केलेल्या कमेंटमध्ये ‘असा जोडीदार सर्वांना नाही मिळत. हे दोघे जन्मोजन्मीच्या नात्याने एकमेकांसोबत जोडले गेलेले आहेत’, असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband build statue of his late wife so that her absence will not be felt on gruhapravesha ceremony scsg
First published on: 11-08-2020 at 11:02 IST