हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, एक तरुण त्याच्या प्रेयसीसाठी गच्चीवर पिझ्झा घेऊन गेला असता त्याचा मृत्यू झाला आहे. हा तरुण गुपचूप त्याच्या प्रेयसीसाठी पिझ्झा घेऊन तिला भेटायला गेल्याचं सांगितलं जात आहे. ते दोघेही गच्चीवर एकमेकांशी भेटले असता त्यांना आणखी कोणीतरी गच्चीवर येत असल्याचा आवाज आला, त्यामुळे तरुण लपण्यासाठी गच्चीच्या एका कोपऱ्यात गेला आणि त्याचा तोल गेला. यावेळी तो चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मोहम्मद शोएब (२०) असं आहे.
प्रेयसीला भेटायला गेला तो परतलाच नाही –
IANS च्या रिपोर्टनुसार, २० वर्षीय मोहम्मद शोएब एका बेकरीमध्ये काम करत होता. शोएब त्याच्या प्रेयसीबरोबर वेळ घालवण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी ते दोघे गच्चीवर बसले असतानाच कोणाच्या तरी पावलांचा आवाज त्यांना आला. शिवाय मुलीचे वडील वरती येत असल्याचा संशय शोएबला आल्यानं तो घाबरला यावेळी तो गच्चीच्या एका कोपऱ्यात लपून बसला.
हेही पााहा- दारूच्या नशेत तरुणीचा भररस्त्यात गोंधळ; पोलीस कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन, VIDEO पाहताच भडकले नेटकरी
लपून बसला आणि हातातील तार सुटली… –
शोएब लपून बसला तेव्हा तो हातात काही तारा पकडून बसला होता. मात्र, यावेळी त्याच्या हातातील तार सुटल्यामुळे तो थेट चौथ्या मजल्यावरून खाली पडला. त्यानंतर लगेचच शोएबला उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बोराबंदा पोलीस शोएबच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत.नपोलीस ही घटना खरंच अचानक घडली की जाणूनबुजून घडवली गेली आहे याचा तपास करत आहेत.
तर काही वृत्तांनी असा दावा केला आहे की, शोएब आणि मुलीचे जवळचे नाते होते आणि शोएबने तिला पिझ्झा खायला देण्याचे वचन दिले होते. रात्री उशिरा शोएब पिझ्झा घेऊन तिच्या घरी पोहोचला तेव्हा हा अपघात झाला. दरम्यान, शोएबच्या वडिलांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.