Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.दररोज जे काही अपघात होतात त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने होतात. हैदराबादमधील एका रस्ते अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका भरधाव ट्रकने बाईकस्वाराला धडक दिली. तसेच त्याला ट्रकच्या पुढच्या चाकाखाली फरफटत नेत असल्याचं दिसतं.

हैदराबादमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ट्रकने एका बाईकला धडक दिली आणि सुमारे ५०० मीटरपर्यंत बाईकला फरफटत नेले. त्यानंतर दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली अडकली. तरीही ट्रकचालक ट्रक थांबवायला तयार नाही त्यानं दुचाकी तशी फरफटत नेली. बाईक ट्रकखाली अडकते, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ट्रकच्या फूटबोर्डवर चढून दुचाकीस्वार आपला जीव वाचवतो.

रवि कुमार नावाच्या एका प्रवाशानं ही घटना पाहिली आणि तिचा व्हिडिओ काढून एक्सवर पोस्ट केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने ट्रकचा पाठलाग करत वनस्थलीपुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला आयएस सदान पोलिसांच्या ताब्यात दिले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Dubai Flood: दुबईच्या महापुरातही टेस्ला गाडीनं केली कमाल; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.