सोशल मीडियावरील सर्वात प्रसिद्ध कपलपैकी एक म्हणजे आएएस अधिकारी अतहर आमिर खान आणि डॉ.महरीन काजी यांची जोडी. दोघंही यावर्षी १ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकले. जुलै महिन्यात दोघांची एन्गेजमेंट झाली होती. त्यानंतर त्यांनी एक रोमॅंटिक शूट केलं होतं. निसर्ग सौंदर्याच्या कुशीत लपलेल्या झाडा-झुडपांमध्ये “देखा तेनु पहली पहली बार वे” और बोले चूडिया” या गाण्यावर या दोघांनीही रोमॅंटिक डान्स केला होता. त्यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आयएएस अधिकारी अतहर आमिर खान पत्नी डॉ. महरीन काजीसोबक रोमॅंटिक डान्स करताना या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ अतहर आमिर यांच्या एक फॅन पेजने रीमिक्स करून इन्साग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही रोमॅंटिक ठुमके लगावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय राहून दोघंही रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. या दोघांचा रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षावही केला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयएएस अधिकारी अतहर आमिर खान आणि डॉ महरीन काजी सोशल मीडियावर सर्वात लोकप्रीय कपल आहे. अतहर खान यांचं पहिला विवाह टीना डाबी यांच्याशी झाला होता. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. या दोघांनीही २०१८ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. डाबी यांनी २०१५ च्या युपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर अतहर खान यांनी याच परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली होती. या दोघांमध्ये घटस्फोट झाल्याचं कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर टीना डाबी यांनी आएएस अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.