हिंदी चिनी भाई भाई म्हणत १९६२ च्या युद्धात चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाच. या युद्धाच्या आठवणी भारत अजूनही विसरला नाही. त्यातूनच चीनने भारताच्या शत्रूला उघडपणे पाठिंबा दिला आहे त्यामुळे भारत आणि चीनचे संबध अधिकच ताणलेले आहे. अशातच चिनी सरकारी वाहिनीने युद्ध छेडले तर ४८ तासांच्या आतच मोटारसायकलवरून चिनी सैनिक दिल्लीत पाठवू असा दावा केला आहे. पण भारतीय नेटिझन्सने मात्र या दाव्याला काही गंभीरपणे घेतले नाही. उलट या चिनी वाहिनीला खास विनोदी चोप भारतीय नेटीझन्सने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO : बंगळुरूमध्ये भररस्त्यात घरमालकाने तरुणीला केली मारहाण

‘इंटरनॅशनल स्पेक्टर’ने एक ट्विट केले आहे. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने जर भारत चीन युद्ध झाले तर ४८ तासांत चिनी सैन्य मोटारसायकलवरून  भारतात दाखल होतील आणि १० तासांत पॅराट्रुपर्स दिल्लीत उतरतील असा दावा त्यांनी केला.  जेव्हा ही बातमी भारतीयांना कळाली तेव्हा ती गांभीर्याने घेण्याऐवजी भारतीय नेटीझन्सने आपल्या विनोदी शैलीत या वाहिनीला चांगलाच चोप दिला. चीनचा हा दावा म्हणजे अतिशयोक्ती आहे हिच भारतीयांची पहिली टीका होती. आधीच या देशातील रस्ते वाईट आहेत, त्यातूनही राजधानीत सैन्य घुसवायचे म्हणजे यांना येथल्या वाहतूक कोंडीची कल्पना त्यांना नाही म्हणून असे फुटकळ दावे ते करत आहेत अशा उपहासात्मक टीका आता ट्विटवर होत आहेत.  जर चिनी सैन्याला भारतात यायचे झालेच तर ४८ तासांत भारतात पोहचण्यासाठी त्यांना स्वत:लाच रस्ता बांधवा लागेल असे म्हणत खिल्ली उडवली जातेय.

Viral : सावधान! मशीनमध्ये गेलेल्या पाचशेच्या नोटेची अशी होतेय दुर्दशा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If war broke out china troops can reach delhi in 48 hours says china state tv
First published on: 18-01-2017 at 19:14 IST