गाणं म्हणजे सुरेल, सुमधूर आवाजाचा संगम असा जो काही आपला पूर्वापार चालत आलेला समज आहे, तो आपल्या ‘आवजा’ने खोडून काढणारी ढिंच्याक पूजा एक नवीन गाणं घेऊन पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे. तिच्या ‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलो का स्कूटर’ आणि ‘आफ्रीन फातिमा बेवफा है’ या गाण्यांनी बराच धुमाकूळ घातला होता. ढिंच्याक पूजाने नुकतेच आपले नवीन गाणं प्रदर्शित केले आहे. “मैं हूं बाइकर, मोटे थोड़ी डाइट कर” असं या गाण्याचं नाव आहे.

आपल्या नव्या गाण्यात ढिंच्याक पूजा एखाद्या बाईक रायडर प्रमाणे बाईकवर स्वार झालेली दिसतेय. तिने काळ्या रंगाचं जॅकेट घातल्यामुळे ती अगदी बाईक रायडरच वाटत आहे. इतर काही मुलं तिच्या बाजूने बाईट चालवत आहे. ढिंच्याक पूजाने १५ जानेवारीला हा व्हिडीओ आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तथापि, या व्हिडीओवरील लाईक, डिसलाईक आणि कमेंट सेक्शन बंद ठेवण्यात आले आहे.

Video : संकेत म्हात्रे – आवाजाच्या दुनियेतील मराठमोळं नाव । गोष्ट असामान्यांची – भाग १२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे ढिंच्याक पूजा?

तिचं खरं नाव आहे, पूजा जैन. ‘ढिंच्याक’ या शब्दाची निवड खुद्द पूजानेच केली असून, यातून तिने एक वेगळी ओळख मिळवली आहे. कोणा एका मित्र/ मैत्रीणीने ती चांगली गाते असा विश्वास दिला आणि तेव्हापासून पॉप संगीतप्रकारात ‘ढिंच्याक’ क्रांती घडवण्याच्या दिशेने पूजाचा प्रवास सुरु झाला. तिच्या गाण्यांमध्ये काहीही तथ्य नसले तरीही सोशल मीडियावर तिच्या नावाची हवा पाहता प्रत्येक गाण्याच्या व्हिडिओवर असंख्य व्ह्यूज मिळण्यासाठीही तिला फार मदत होते. ‘सेल्फी मैने ले ली आज’ या एका गाण्याने तिला सात लाख रुपये मिळवून दिले होते.