एका वृद्ध व्यक्तीने ९ दिवसांमध्ये विनाकारण पोलिसांना जवळपास २ हजारांहून अधिक फोन केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शिवाय हा वृद्ध व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन करून तेथील पोलिसांना शिवीगाळ करायचा. त्यामुळे या वृद्ध व्यक्तीना आता पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय तपासादरम्यान, ही वृद्ध व्यक्ती अनेक वर्षांपासून पोलिसांना विनाकारण त्रास देत असल्याचंही उघडकीस आलं आहे. मात्र, अलीकडच्या काही दिवसांमध्ये त्याची फोन करण्याचे प्रमाण वाढले होते.

SoraNews24 नुसार ही घटना जपानमधील असून या घटनेतील आरोपीचे वय ६७ वर्ष आहे. हा आरोपी सैतामा प्रीफेक्चरल पोलीस स्टेशनमध्ये वारंवार फोन करून पोलिसांना नको ते बोलायचा. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने केवळ ९ दिवसांत २वेळा हजार ६० वेळा कॉल केले होते. एवढंच नव्हे तर ही व्यक्ती पोलिसांना कर चोरी करणारे तर कधी मुर्ख म्हणायचा.

हेही वाचा- Video: बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावावर काळाचा घाला; हृदय पिळवटून टाकणारा अपघात कॅमेऱ्यात कैद

शिवाय तो पोलिसांना कामावरुन काढून टाकण्याची मागणीही करायचा. या आरोपीने ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात पोलिसांना हजारांवर फोन केले तो दर ६ मिनिटांनी एक फोन करायचा. त्याच्या या सततच्या फोनमुळे पोलिसांची हेल्पलाइन सेवा विस्कळीत व्हायची शिवाय महत्वाचे फोन व्यस्त लागण्याचा प्रकार घडायचा.

अटक होणार याचा होता विश्वास-

पोलिसांनी या आरोपीला २८ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर त्याने सर्व आरोप मान्य केले. शिवाय एक दिवस पोलिस मला पकडण्यासाठी येतील हे मला माहित होतं असंही तो म्हणाला, मात्र तो फोन का करायचा यामागचं कारण काही त्याने सांगितलेलं नाही. पण पोलिसांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने फोन केल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही पाहा- Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’

आरोपीचं कॉल रेकॉर्ड तपासलं असता तो अनेक वर्षांपासून हे कृत्य करत असल्याचे उघडकीस आलं आहे. दरम्यान, २०१९ मध्ये अशीच एक घटना घडली होती. त्या घटनेत एका ७१ वर्षीय व्यक्तीने त्याच्या टेलिकॉम प्रोव्हायडरला तब्बल २४,००० फोन करत शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याच घटनेची ही पुनरावृत्ती आता झाल्याचं बोललं जात आहे.