सर्वधर्म समभाव, भारतात लोकशाही टिकून राहण्यापाठीमागचं हे महत्वाचं कारण मानलं जातं. संकटकाळात भारतीय लोकांनी प्रत्येकवेळी आपला धर्म विसरुन संकटात सापडलेल्या प्रत्येकाची मदत केली आहे. सध्या संपूर्ण देश करोना विषाणूशी लढतो आहे. मुस्लीम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा ईदचा सण सोमवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुस्लीम बांधव मशिदीत येत, नमाज पठण करतात. मात्र सध्याच्या खडतर काळात अनेक मुस्लीम धर्मगुरु घरात राहुनच ईद साजरी करण्याचा सल्ला देत आहेत. दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये काही शीख तरुणांनी भारतात माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जामा मशिदीचं व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांशी आणि धर्मगुरुंची परवानगी घेऊन दिल्लीतील काही शीख तरुणांनी ईदच्या काही दिवस आधी मशिदीचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला आहे.

शीख बांधवांनी सामाजिक जबाबदारी ओळखून केलेल्या कामाबद्दल त्यांचं सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

सध्या संपूर्ण देश करोना विषाणूशी लढतो आहे. या विषाणूवर अद्याप औषध सापडलेलं नसल्यामुळे ही लढाई छुप्या शत्रुविरोधातली लढाई असल्याचं सरकारी यंत्रणा वारंवार सांगत आहेत. दोन समाजांमध्ये तेढ पसरवणाऱ्या अनेक बातम्या आपल्याला पहायला मिळतात. मात्र शीख तरुणांनी केलेल्या या कृतीचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In a touching gesture sikhs sanitise jama masjid ahead of eid psd
First published on: 24-05-2020 at 17:09 IST