आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. मात्र याच लिफ्ट दुर्घटनेच्या आपण अनेक घटना एकतो. अशीच एक घटना दिल्लीतील नोयडामध्ये घडली. एका सोसायटीतील ८ जण लिफ्टमध्ये अडकले होते. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
एकाच कुटुंबातील ८ जण अडकले लिफ्टमध्ये –
ग्रेटर नोएडातील गोल्फ गार्डनिया सोसायटीमध्ये बुधवारी रात्री एकाच कुटुंबातील 8 जण लिफ्टमध्ये 2 तास अडकले होते. यामध्ये दोन वृद्ध, दोन महिला, दोन मुले आणि दोन तरुणांचा समावेश होता. लिफ्टमध्ये अडकलेले लोक बराच वेळ मदतीसाठी ओरडत होते. यावेळी बाहेरच्या लोकांना ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. २ तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या ८ ही जणांना बाहेर काढण्यात यश आलं. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: माकडासोबत त्याने असे काही केले की…नेटीझन्स झाले हैराण! म्हणाले…
योग्य देखभाल न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून सगळ्यांना सुखरुप बाहेर काढलं.