उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. ती म्हणजे तेथील एका घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याला महागड्या दारुचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे तो ज्या घरात चोरी करायला आला होता त्याच घरातील दारु प्यायला आणि बेडरूममध्ये झोपला. या घरातील लोक आपल्या परतले असता त्यांना बेडरूममध्ये एक व्यक्ती निवांत झोपलेली दिसली. तो चोर असल्याचं समजताच त्यांनी त्याला तुरुंगात धाडलं, त्यामुळे चोरट्याला दारुचा मोह चांगलाच महागात पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरात हा चोर शिरला होता त्या घरमालकाचं नाव शरवानंद असं आहे. ते नायक सुभेदार म्हणून सैन्यातून निवृत्त झाले असून ते लखनऊच्या कँट पोलीस स्टेशन परिसरातील कटारी भागात आपल्या कुटुंबासह राहतात. घटनेच्या दिवशी शरवानंद हे नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून ते घरी परतले. मात्र, घरात येताच त्यांना घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या दिसल्या त्यानंतर ते बेडरुममध्ये पोहोचताच त्यांना एक तरुण आरामात झोपल्याचं आढळलं. शिवाय त्याच्या शेजारी दारूच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसल्या.

हेही वाचा- PhonePe च्या ‘साउंड बॉक्स’ला बनवलं म्युझिक स्पीकर, तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले…

दरम्यान, घरातील लोक चोरटा उठण्याची वाट पाहू लागले. चोराला जाग येताच घरच्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याने आपले नाव सलीम असल्याचे सांगितले. तर घरातून १० तोळे सोने, दीड लाख किमतीची चांदी, सुमारे ५० हजार किमतीच्या महागड्या साड्या आणि ६ लाख रुपयांसह महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याचं घरातील लोकांनी सांगितलं.

हेही पाहा- पठ्ठ्याने पैशांसाठी केला भन्नाट जुगाड, कोंबडीला हिरवा रंग देऊन OLX वर ६ हजार ५०० रुपयांना विकलं, बातमी वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीने चौकशीत सांगितले, “मी साथीदाराच्या मदतीने घरात घुसला आणि संपूर्ण घरात चोरी केली. दागिने हिसकावण्यासाठी त्याच्याबरोबर आलेल्या साथीदाराने आपणाला जास्त दारू पाजली आणि तो पळून गेला.” पोलीस या चोरट्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. एडीसीपी ईस्ट झोन अली अब्बास यांनी सांगितले की, एका चोराला पकडले असून त्याच्या जबाबावरुन दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे.