चहाशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही. चहाप्रेमी कधीही, कुठेही आणि केव्हाही चहा पिऊ शकतात. चहाप्रेमींसाठी अनेक विक्रेते नवनवीन प्रकारचे चहा बाजारात घेऊन येत असतात. कधी चॉकलेट चहा, कधी तंदुरी चहा..असे अनेक चहाचे प्रकार पाहिले असतील. पण आता बाजारात नवीन चहाचा प्रकार आला आहे. तुम्ही चहाप्रेमी असाल तर तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहून धक्का बसू शकता.

सध्या एका नव्या चहाचा प्रकाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क हाजमोला चहा तयार केल्याचे दिसते. फूड ब्लॉगरने इंस्टाग्रामवरव eatthisdelhi या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हाजमोलाचा चुरा करतो आणि चहामध्ये टाकतो. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हिडिओ वाराणसीमधील असल्याचे समजते. कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ”वाराणसीमधील मोदीजींचा आवडती चहाचा कॉर्नर जिथे हाजमोला चहा मिळतो. हे दुकान गेल्या ८० वर्षांपासून सुरू आहे. स्थळ : पप्पू की अदी, अस्सी रोड, भेलूपूर वाराणसी”

व्हिडीओ पाहून अनेकांना या चहाची चव कशी असेल असा प्रश्न पडला होता तर काहींनी या चहावरून मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
एकाने कमेंट केली , खाल्ले-प्यायलेले सर्वकाही पचेल” तर दुसऱ्याने कमेंट केली की, ही अस्सी घाटावरची प्रसिद्ध चहा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही चहा प्रेमींनी हा चहा पाहून नाराजी व्यक्ती केली. एकाने म्हटले, ”चहाच्या नावावर कलंक आहे. ” दुसऱ्याने म्हटले ”चहाचा अपमान करू नका”, तिसऱ्याने म्हटले की, ”चहा असा बनवा की चार लोक म्हणतील…”