लहान मुलांना सांभाळण खूप कठीण असतं ते कधी काय करतील याचा नेम नसतो. शिवाय आपण करणाऱ्या एखाद्या कृतीचे आपल्यावर काय परीणाम होतील याची कल्पना या चिमुकल्यांना नसते. त्यामुळे पालकांनाच त्याच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. मात्र, कधीकधी पालकांते लक्ष नसताना मुलं अत्यंत धोकादायक कृत्ये करतात. त्यांनी ही कृत्य अजानतेपणी केली असली तरी त्याचे परिणाम गंभीर होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- जवान नव्हे जीवनदाता! CISF जवानांच्या कार्यतत्परतेमुळे बचावला प्रवाशाचा जीव; पाहा Viral Video

सध्या अशीच एक घटना समोर आली असून पेन्सिलवर असणाऱ्या सालीमुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील आहे. ही लहान जेव्हा शार्पनर तोंडात धरून पेन्सिलला टोक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. सहा वर्षांची मुलगी आपल्या भावासोबत घराच्या टेरेसवर अभ्यास करत बसली होती. यावेळी तीने पेन्सिलला टोक करायला सुरुवात केली आणि ही दु:खद घटना घडली.

हेही वाचा- कुत्र्याने मालकाचा जीव वाचवला पण अन्न पाण्याचा त्याग करत स्वत:चा जीव गमावला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

तोंडात शार्पनर घालून पेन्सिलला टोक करत असताना दुर्दैवाने पेन्सिलच्या वरचा सालीसारखा भाग या मुलीच्या घशात अडकला. साल घशात अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिला गुदमरायला सुरुवात झाली. मुलीची ही अवस्था पाहून कुटुंबीयांचा एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलीला तात्काळ एका रुग्णालयात दाखल केलं.

हेही पाहा- पाळीव असला तरीही तो सिंहच…! जंगलाच्या राजाशी मस्करी करणं अंगलट, साखळी घालायला गेला अन्…

मात्र, रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषीत केलं. मुलीच्या श्वास नलिकेत पेन्सिलची साल अडकल्यामुळे तिला वाचवता आलं नसल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण हमीरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या नंदकिशोर नावाच्या व्यक्तीचा मुलगा आणि दोन मुली गच्चीवर अभ्यास करत असताना ही दुर्देवी घटना घडली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uttar pradesh pencil peel blocked the trachea of little girl and she died jap
First published on: 22-12-2022 at 20:16 IST