उत्तराखंडमधील एका महिलेने हातात काठी घेत बँकेत घुसून राडा करत बॅंकेच्या एटीमच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने एटीमच्या काचा फोडल्याची घटना उत्तराखंडमधील काशीपूरच्या रतन सिनेमा मार्गावर असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक महिला काशीपूरच्या रतन सिनेमा मार्गावर असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या बँकेत घुसली. बॅंकेत जाऊन तिने तिच्या खात्यातील पैशांची मागणी तेथील कर्मचाऱ्यांजवळ केली. बँक कर्मचाऱ्यांनी महिलेचे खाते तपासलं असता तिच्या खात्यात पैसेच नसल्याचं त्या महिलेला सागितलं. आपल्या खात्यात पैसे नाहीत असं कर्मचाऱ्यांनी सांगताच ही महिला संतापली आणि तिने बँकेतच आरडाओरडा करायला सुरुवात केली.

हेही वाचा- १० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का

महिलेने बॅंकेतच राडा करत अधिकाऱ्यांवर ओरडायला सुरुवात केली म्हणून बॅंक कर्मचाऱ्यांनी तिला बॅंकेतून बाहेर काढलं. कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्यामुळे या महिलेचा पारा आणखी वाढला आणि तिने बॅंकेबाहेर जवळपास तासभर गोंधळ घातला. एवढेच नव्हे तर तिने आजूबाजूच्या दुकानांच्या काचा फोडण्याची धमकी देत, बँकेबाहेर असणाऱ्या एटीएमच्या काचा फोडल्या.

हेही पाहा – प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सर्व घटनेची माहिती व्यवस्थापक श्रावणकुमार जाट यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर उत्तराखंड पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसतं असल्याची माहिती पोलिस अधिकारी मनोज रतुडी यांनी दिली. शिवाय या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.