Viral Video :- एखादा सण येणार असेल तर सोशल मीडियावर त्या संबंधित तुम्हाला अनेक गोष्टी दिसू लागतात; तर येत्या ३० ऑगस्टला रक्षाबंधन आहे. बहीण आणि भावाच्या नात्याचा हा सण. याचं औचित्य साधून अनेकजण सोशल मीडियावर रक्षाबंधनासाठी भेटवस्तू, खास हॅम्पर, विशिष्ट राखी, रक्षाबंधनासाठी विविध ड्रेस, अनेक पदार्थ यांचे अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येत आहेत; तर काही कलाकार त्यांच्या कलेचा वापर करून रक्षाबंधन या सणासाठी काहीतरी खास करून दाखवताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका व्यक्तीने गणपतीच्या चित्रात खास कला सादर केली आहे.
आतापर्यंत तुम्ही गणपतीच्या आकृतीत अनेकांची नावे लिहिलेली पहिली असतील. पण या व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने रक्षाबंधन व भाऊ आणि बहीण असे लिहून गणपतीचे एक सुंदर चित्र काढले आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, व्यक्ती सुरुवातीला हात जोडतो आणि फळ्यावर रक्षाबंधन डाव्या हाताने लिहितो. आणि रक्षाबंधन या अक्षराला जोडून गणपतीच्या चेहऱ्याचं चित्र काढतो. नंतर पुढे गणपतीचे हाताचे चित्र काढतो आणि बहीण-भाऊ हे शब्द लिहून त्यात गणपतीचे पायसुद्धा अक्षरांच्या सहाय्याने काढतो. त्यानंतर राखीचे चित्र काढून त्याला जोडून उंदराचे चित्रसुद्धा रेखाटतो . कलाकारांचे हे अद्भुत कौशल्य अनेकांना चकित करून सोडेल एवढं नक्की. तसेच या व्यक्तीने डाव्या हाताने ही पूर्ण कला सादर केली आहे, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. रक्षाबंधन आणि भाऊ-बहीण लिहून या व्यक्तीने सुंदर असे गणपतीचे चित्र फळ्यावर रेखाटलेले तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल. एकदा बघाच या अनोख्या कलाकाराची अनोखी कला…
हेही वाचा… स्पॅम कॉल्सपासून सुटका करण्यासाठी महिलेचा भन्नाट जुगाड, व्हायरल VIDEO पाहून पोट धरुन हसाल
व्हिडीओ नक्की बघा :
सोशल मीडियावरील हा व्हिडिओ @ashishmpandey या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ही उत्तम कला सादर करणाऱ्या कलाकाराचे नाव ;आशिष पांडे असं आहे. तुम्ही या कलाकाराच्या अकाउंटवर एकदा नजर टाकलीत तर तुम्हाला अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ दिसून येतील. सणांदरम्यान कलाकारांच्या अशा विशिष्ट कलेचं सादरीकरण सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतं.
