ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची दाणादाण उडाली. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भारतीय डावाला खिंडार पाडलं. पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारणारे भारताचे धुरंधर दुसऱ्या डावात पूर्णपणे अपयशी ठरले. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल हे स्वस्तात माघारी परतले.
भारताच्या या लाजीरवाण्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली असून काहींनी तर शास्त्री यांची हकालपट्टी करत राहुल द्रविडला संधी देण्याची मागणी केली आहे. पाहूयात भन्नाट मिम्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या डावात भारतीय संघाचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली माघारी परतणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.