चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात आघाडीची फलंदाजी कोलमडल्याचे कोणतेही दडपण न घेता आपली नैसर्गिक खेळी करत पांड्याने कमी चेंडूत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पल्लवीत होत असतानाच तो धावबाद झाला. ओव्हलच्या मैदानात पांड्याची दमदार खेळीमध्ये जाडेजा अडथळा ठरल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. या सामन्यातील एका चुकीमुळे रवींद्र जाडेजा नेटीझन्सच्या दृष्टीने जणू विलनच ठरलाय. ‘अनऑफिशिअल मुंबई हायकोर्ट’ या फेसबुक पेजवर तर जाडेजाच्या पुढची सर ही पदवी हटवून ती पांड्याला द्या अशा मागणी केलीय. या फेसबुक पोस्टवर शेकडोंनी कमेंट येत असून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या सहकाऱ्याला ठरवून कोण बाद करत नाही. त्यामुळे जाडेजाने ही चूक मुद्दाम नक्कीच केली नव्हती. शेवटी खेळात दबावामुळे छोट्या मोठ्या चुका होतच असतात, पण क्रिकेटशी भारतीयांची जरा जास्तच इमोशनल अटॅचमेंट जोडली गेल्याने जाडेजाच्या चुकीला मात्र फॅनच्या दृष्टीने माफी नाहीच. तेव्हा जाडेजा आता पुढेचे काही दिवस भारतीय चाहत्यांच्या रोषाचा बळी ठरणार हे नक्की.
या सामन्यात भारतीय संघाचा १८० धावांनी दारूण पराभव झाला. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीने निराशाजनक कामगिरी केली, पण भारतीय संघाची बुडत चाललेली नौका हार्दिक पांड्याने तारण्याचा प्रयत्न केला. ४३ चेंडूत त्याने ७६ धावा करत भारताला यश मिळवून देण्यासाठी तो धडपडत होता, पण अखेर पांड्याचे सारे प्रयत्न अपयशी ठरले आणि तो धावबाद झाला. मैदानात पांड्याची विकेट सगळ्यांनाच चटका लावून गेली. भारतीय संघाने मोठ्या फरकाने सामना हरला तरी पांड्याने मात्र सगळ्यांचेच मन जिंकलं. अर्थात पांड्याच्या तंबूत परतण्यामागे सगळेच रवींद्र जाडेजाला जबाबदार धरत आहे.
#INDvPAK ravindra jadeja in today's match pic.twitter.com/nkcCt2y736
— Tyrion Targaryen (@21PFANCLUB) June 18, 2017
Where is Ravindra Jadeja's home? #IndVsPak pic.twitter.com/NGVY8lHfly
— Farrago Abdullah Parody (@abdullah_0mar) June 18, 2017
जडेजा : अश्विन मला एक सांग की लेका
अश्विन : बोल की र
जडेजा : पांड्या मला लय मारील व्हय
———-
हवामान खात्याचा ईशारा…
हार्दिक पांड्या सोडुन कोणीही पंधरा दिवस भारतात येवु नये…..
जडेजाने तर दीड वर्ष तोंड दाखवू नये आणि इंग्लडमध्येपण आठवडाभर जपून रहावे…….
———-
जाडेजा ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे!
#तुला_नाय_मला_घाल_कुत्र्याला
#IndvsPak
———