Rice Export Ban: टोमॅटो सध्या महागला असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून तात्पुरता गायब झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढत आहेत. किलोसाठी या फळभाजीच्या दरााने केव्हाच शंभरी गाठली आहे. टोमॅटोच्या दरांमध्ये अचानक वेगाने झालेल्या वाढीला कमी पुरवठा हेही एक कारण आहे. अशातच आता तांदळाच्या निर्यातीबद्दल सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात तांदळाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारनं तांदूळ निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते. अनेक देश तांदळासाठी भारतावर अवलंबून असतात. आता भारतानं तांदूळ निर्यातीवर बंदी आणल्यानं जगभरात महागाई वाढण्याची भीती आहे.
अमेरिकेत भारतीयांची तांदुळ खरेदीसाठी झुंबड
भारत सरकारने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेत तांदळाची मागणी वाढली आहे. भारतानं निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचे सर्वाधिक परिणाम अमेरिकेत दिसून आले. अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी दुकानांमध्ये धाव घेत मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केला. लोकांची अक्षरश: झुंबड याठिकाणी पाहायला मिळाली.
काहींनी तर कार्यालयातील बैठका अर्ध्यावर सोडून दुकानं गाठली आणि तांदळाच्या गोणी खरेदी केल्या. अमेरिकेतील दुकानांमध्ये आता तांदळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. अमेरिकेतील भारतीय दुकानातील तांदळाच्या किमती आधीच वाढवल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – पावसाचा हाहाकार! नदीच्या प्रवाहासारखं रस्त्यावरुन वाहतंय पाणी, बाईकसह माणसं गेली वाहून, Video व्हायरल
निर्यातीवर बंदी असतानाही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) भारताची सुगंधी बासमती आणि गैरबासमती तांदूळ निर्यात ७.३७ टक्क्यांनी वाढून १२६.९७ लाख टन झाली आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत ही निर्यात ११८.२५ लाख टन होती. निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय सेतिया म्हणाले की, तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध असूनही, एकूण निर्यात आतापर्यंत भक्कम आहे. बासमती तांदूळ प्रामुख्याने अमेरिका, युरोप आणि सौदी अरेबियाच्या बाजारपेठेत पाठवला जातो, तर बिगर बासमती तांदूळ आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.