मध्य प्रदेशातील इंदूर इथून एक हृदयद्रावक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना छोटी ग्वाल्टोली पोलीस स्टेशन परिसरात घडली. मार ज्योती ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करणारे एक जोडपे त्यांच्या १५ दिवसांच्या बाळाला सीटवर सोडून पळून गेले. बस सरवटे स्टँडवरून निघाली होती.

मिळालेल्या वृत्तानुसार, बसमधील दोन प्रवासी एक पुरूष आणि एक महिला, मुलाला सीटवर सोडून कोणालाही न कळवता निघून गेले. बस चालक आणि कंडक्टरने मुलाला एकटे पाहिले तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच छोटी ग्वाल्टोली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बस पोलीस स्टेशनसमोर थांबवली.

पोलिसांनी बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या. दरम्यान, एका महिला कॉन्स्टेबलने बाळाची काळजी घेतली, आईप्रमाणे प्रेम आणि काळजी घेतली. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वत:च्या कुटुंबाने त्याला सोडून दिल्यानंतर दुसऱ्याच्या मुलाची काळजी घेतल्याबद्दल लोक महिला कॉन्स्टेबलला सलाम करत आहेत.

स्टेशन प्रभारींनुसार, बाळ सुमारे १५ दिवसांचे असल्याचा अंदाज आहे. बाळाला आरोग्य तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे आणि त्याच्या काळजीची व्यवस्था केली जात आहे. हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या जोडप्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस जवळच्या बस स्टँड आणि इतर ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोषींवर कारवाई केली जाईल. बाळाची सुरक्षितता आणि संगोपन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण युनिटलादेखील कळविण्यात आले.

या व्हिडीओवर लोकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. ज्याला मुले नाहीत अशा कोणालाही विचारा, मला आश्चर्य वाटते की, कोणत्या प्रकारची आई इतक्या निष्पाप मुलाला सोडून देईल. दुसऱ्या युजरने म्हटले की, ज्याला त्याची गरज आहे त्याच्याकडे ते का नाही आणि ज्याला कदर नाही त्याला ते का मिळते.