Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे थक्क करणारे असतात. ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते.

कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं. सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरिक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल या बद्दत नियोजन आखतात. अन् चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लान बी रेडी असतो. चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही. पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते. अन् शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच.

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तराखंडमधील हरिद्वार शहरात घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिला आपल्या मुलीसोबत स्कूटीवरून जात असते, तेवढ्यात एक बाईकस्वार स्नेचर अचानक वेगाने येतो आणि तिच्या गळ्यातील चैन ओढतो. नशिबाने त्याच्या हातात चैन येत नाही. पण पुढे जाऊन त्या चोराचा तोल जातो आणि काहीच अंतरावर जाऊन तो त्याची बाईक पडते.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता सर्वांमध्येच भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना आपल्या अमुल्य गोष्टींची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे.