मीटिंग वर मीटिंग, लेक्चर्स, वर्क फ्रॉम होम मुळे घरची व कामाची डबल ड्युटी.. हे सगळं आवरताना तुमचाही सोमवार गडबडीतच सुरु झाला असणार, हो ना? पण आता जरा निवांत होण्यासाठी आम्ही काही खास क्लिप्स घेऊन आलो आहोत. आज, ८ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस (International Cat Day) साजरा केला जातो. एकदम डॅशिंग लुकच्या तरीही निरागस दिसणाऱ्या मांजरीचे खेळताना, बागडताना व करामती करतानाचे काही मजेशीर व्हिडीओज व या आंतरराष्ट्रीय मांजर दिनाचा इतिहास आज आपण पाहुयात..

मांजर ही फार पूर्वीपासून माणसांची सोबत देत आली आहे. दिवसभर थकून घरी आल्यावर आपल्या पेट्स सोबत घालवलेले काही क्षण सर्व तणाव विसरायला लावतात असे अनेक पेट पालकांनी सांगतात. त्यांच्या याच सोबतीसाठी २०२० पासून प्राणी कल्याण निधीतुन आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. १९५८ पासून मांजरीच्या बचावाचे काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅट केअर संस्थेकडून या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra News : सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन
VBA Candidate List
Maharashtra News : वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश
tharala tar mag marathi serial
‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्रात पुन्हा नंबर १! टीआरपीत मारली बाजी, सायली-अर्जुनने शेअर केली खास पोस्ट
aditya thackeray
Maharashtra Breaking News : ‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; आदित्य ठाकरे यांची टीका

…आणि भल्या मोठ्या प्राण्याचा सेकंदात झाला बॉल, Armadillos चा Viral Video पाहून व्हाल थक्क

Funny मांजरी

मांजरी या अत्यंत हुशार प्राण्यांपैकी एक आहेत. मांजरीचा मेंदू मोठा आणि विकसित असतो.

हे व्हिडीओ पाहून आपला थकवा नक्कीच गेला असेल अशी अपेक्षा.. आणि हो तुमच्याकडे जर मांजर असेल तर तिच्यासाठी आज खास सेलिब्रेशन करायला विसरू नका.