कोची मेट्रो अनेक चांगल्या वाईट कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मेट्रोमॅन श्रीधरन यांना उद्घाटनास निमंत्रण देणं विसरणं किंवा तृतीयपंथीयांना नोकरी देणं अशा अनेक गोष्टींमुळे ही मेट्रो चर्चेत आली. यावेळी कोची मेट्रो तिच्या मॅस्कॉटमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पंख असेलेल्या निळ्या हत्तीची मेट्रोनं मॅस्कॉट म्हणून निवड केली आहे. या हत्तीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुटही आहे. जे शुभ शकुन मानलं जातं. ‘या मॅस्कॉटला काहीतरी छान नाव सुचवा’ अशा आशयाचं सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू करण्यात आलं.
ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?
म्हणजे केरळात हत्तीसाठी ‘अप्पू’, ‘कुटन’ अशी नावं प्रचलित आहेत. पण कोची मेट्रोला आपल्या मॅस्कॉटसाठी काहीतरी हटके नाव हवं होतं, म्हणून त्यांनी सोशल मीडियाची मदत घेतली. याद्वारे लोकांना नवनवीन नावं सुचवण्याचं आवाहन करण्यात आलं. ज्या नावाला सर्वाधिक पसंती मिळेल ते नाव मॅस्कॉटला ठेवण्यात येईल. पण, लोकांनी या मॅस्कॉटला एका भाजप नेत्याचं नाव सुचवलं आहे आणि याच नावला सर्वाधिक पसंती मिळत आहे. कोची मेट्रोनं या निळ्या हत्तीचं नाव ‘कुम्मानन’ ठेवावं असा आग्रह करण्यात येत आहे.
Viral : वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशाची जेव्हा सटकते
या आग्रहाचं कारणंही मजेशीर आणि सरकारला चिमटा काढण्यासारखंच आहे. त्याचं झालं असं की, कोची रेल्वेच्या उद्धाटनास पतंप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन उपस्थित होते. या पाहुण्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानन राजाशेखरन हेही सहभागी होते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे, अशा समारंभात अचानक भाजपचे नेते दिसल्यानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. म्हणूच या मॅस्कॉटला दुसरं तिसरं कोणतंही नाव न देता ‘कुम्मानन’ याचं नाव द्या असा आग्रह लोक करत आहे. अर्थात हे नाव उपरोधिकपणे लोकांनी सुचवलं आहे पण त्यालाच सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे कोची मेट्रो काय भूमिका घेईल हे पाहणं मजेशीर ठरेल.