iphone 17 Lunch Today: आज टेक जगतात सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ॲपलचा मोठा इव्हेंट होत आहे. या कार्यक्रमात कंपनी आपली नवी आयफोन १७ सीरिज सादर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोन सीरिजबद्दल सतत नवनवीन अफवा समोर येत होत्या. आज अखेर त्यावर अधिकृत घोषणा झाली आहे. ॲपल कंपनीने त्यांच्या नवीन सीरिजचे चार मॉडेल्स आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन १७ एअर लाँच करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ‘प्लस’ हा व्हेरियंट काढून नवा ‘एअर’ मॉडेल बाजारात आणला आहे. तर नवीन आयफोन सीरिजच्या किमतीपासून प्री-बुकिंगपर्यंत आणि फीचर्सबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊयात…

⦁आयफोन १७ ची किंमत: भारत आणि अमेरिका

आयफोन १७ चे बेस मॉडेल भारतात ८९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार असून अमेरिकेत त्याची किंमत ८९९ डॉलर असू शकते; असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नवीन आयफोन १७ एअर या मॉडेलची किंमत भारतात ९९,९९९ असून अमेरिकेत त्याची किंमत ९९९ डॉलर एवढी असू शकते. प्रो मॉडेल्सबाबत बोलायचं झालं तर आयफोन १७ प्रोची किंमत भारतात १,३४,९९९ आणि अमेरिकेत १,९९९ डॉलरला असेल अशी चर्चा सुरू आहे. सर्वात महागडा व्हेरियंट आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत भारतात १,६४,९९९ तर अमेरिकेत १,४९९ डॉलर किमतीला उपलब्ध असणार आहे.

⦁ प्री-बुकिंग आणि सेल तारीख

आयफोन १७ सीरिज प्री-बुकिंगसाठी १२ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध असणार आहे, तर ग्राहकांना १९ सप्टेंबर २०२५ पासून आयफोन १७ खरेदी करता येणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात iPhone प्रेमींसाठी हा मोठा आनंदाचा क्षण ठरणार आहे.

iphone 17
फोटो सोैजन्य – google Trands

⦁आयफोन १७ चे फीचर्स

१. आयफोन १७ : मागील मॉडेलसारखीच अनेक डिझाईन एलिमेंट्स तसेच ठेवण्यात आले असून अगदी छोट्या-छोट्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

२. आयफोन १७ एअर : हे मॉडेल बाजारातील सर्वात स्लिम आयफोन ठरू शकते. सॅमसंग Galaxy S25 Edge ला रिप्लेस करत हा फोन सर्वात स्लिम डिव्हाइस म्हणून ओळखला जाईल. यात ४८ मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा देण्यात येणार आहे.

३. आयफोन प्रो आणि प्रो मॅक्स : या दोन्ही हाय-एंड मॉडेल्समध्ये त्रिकॅमेरा सेटअप मिळेल. त्यात ४८MP प्रायमरी, ४८MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि ४८MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश असेल, त्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी अनुभव नव्या उंचीवर जाण्याची अपेक्षा आहे.

४. डिस्प्ले : सीरिजमधील सर्वच मॉडेल्सना ProMotion OLED डिस्प्ले देण्यात आला आहे; ज्याचा १२०Hz रिफ्रेश रेट असेल, त्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अत्यंत स्मूथ असणार आहे.