Birdev done victory rally video: आपल्या चिकाटीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव ढोणेनं यूपीएससीचं मैदान मारलं आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ५५१वा रँक घेऊन पठ्ठ्याने आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. बिरदेवला भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा तो बेळगावजवळील एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होता, ही वार्ता जेव्हा यमगे गावी पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरांनं मिळविलेल्या लख्ख यशात उजळून निघाला आहे. दरम्यान यानंतर बिरुदेव ढोणे याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. अशातच त्याच्या या विजयाची जंगी मिरवणूक गावातून काढण्यात आली, यावळी काय झालं तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गावामध्ये आपीएस बिरुदेव ढोणेच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली होती. मोठ्या जल्लोषात बिरुदेव याचं स्वागत करण्यात आलं, स्वागताला हारतुरे, फुलगुच्छे मोठी गर्दी जमली होती. अशातच विजयाच्या मिरवणुकीत डॉल्बीचा मोठा आवाज येत आहे. यावेळी बिरुदेव ढोणे यानं सामाजिक भान राखत मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज कमी करण्याची विनंती केली. या सगळ्या जल्लोषात सामाजिक भान राखल्यामुळे बिरुदेव ढोणे याचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. तर अनेकांनी त्याच्या यशामागे हेच कारण असल्याचं म्हंटलं आहे.

वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे. निकाल लागताच केलेल्या कौतुकाचा सत्काराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by बेल भंडार (@belbhandar_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय.