रस्त्यावर गाडी चालवण्याआधी ड्रायव्हिंग टेस्ट देणे प्रत्येकासाठी बंधनकारक असते. काही देशांमध्ये ही परीक्षा पास होणे सोपे असले तरीही काही देशांमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देणे म्हणजे सर्वांत कठीण गोष्ट असते. असे म्हणतात की जपान, अरब, फिनलँड या देशांमधील ड्रायव्हिंग टेस्ट पास करणे अतिशय कठीण आहे. सध्या चीनमधील एका ड्रायव्हिंग टेस्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही चक्रावून जाल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण चीनमध्ये होणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्टची पातळी पाहू शकतो. विशेष म्हणजे या टेस्टचे हे पहिलेच चरण आहे. मात्र हे पहिले चरण पाहूनच नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही चक्कर येईल. व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की ही टेस्ट पास होणे प्रत्येकालाच शक्य होणाऱ्यातली गोष्ट नाही.

मुलीचं स्वप्न पूर्ण झाल्यावर पित्याला आकाशही झाले ठेंगणे; अतिआनंदाने झाली अशी अवस्था की…

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की चालकाला येथे वाहन चालवण्यासाठी एक मार्ग आखून देण्यात आला आहे. मात्र हा मार्ग साधासुधा मार्ग नाही. चालकाला यामध्ये अनेक आव्हाने देण्यात आली आहेत. यामध्ये पार्किंगपासून “8” बनवण्यापर्यंत अनेक गुंतागुंती आहेत. तसेच, वाहनचालक या मार्गिकेला स्पर्श करू शकत नाहीत किंवा मार्गिकेच्या बाहेर जाऊ शकत नाही. असे केल्यास चालक ही टेस्ट पास होण्यास असमर्थ असेल.

मस्क यांच्या ट्वीटरला सापडला पर्याय! नवं अ‍ॅप ठरतंय ट्वीपल्सचं ‘सेकेण्ड होम’; जाणून घ्या Mastodon बद्दल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होणारा हा भन्नाट व्हिडीओ तनसू येगेन यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘ड्रायव्हर लायसन्स एक्झामिनेशन स्टेशन इन चायना’. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या वाहनचालकाच्या कौशल्याचे कौतुक आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत साडे बारा मिलिअनहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर एक लाख ८० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.