आज प्रत्येक व्यक्ती कंटाळ आला किंवा कामावरून थकून आलो की लगेच ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो. त्यासाठी वेगवेगळे अॅप आहेत. त्यात झोमॅटो हे लोकप्रिय अॅप आहे. तुम्ही कसली ऑर्डर दिल्यानंतर ते काही वेळातच तुम्हाला पाहिजे तेथे ते मिळेल अशी गॅरेंटी दिलेली असते. लवकरात लवकर ती ऑर्डर दिली जावी यासाठी डिलिव्हरी बॉय नेहमीच प्रयत्न करतात. पण आता झोमॅटोनं वेळेबाबत त्यांच्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी कळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी झोमॅटोवर टीका केली आहे.

झोमॅटोचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही बातमी दिली होती. अनेक नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर रोहित पवार यांनी टीका केली आहे. “डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

आणखी वाचा : साडे सात वर्षांनी ‘या’ राशीचे लोक होणार साडेसाती पासून मुक्त

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

आणखी वाचा : ‘सामी सामी’ गाण्याच्या ‘या’ मराठमोळ्या व्हर्जनने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ! तुम्ही ऐकलत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्त मागणी असलेल्या ग्राहक परिसरातच ही जलद डिलिव्हरी सेवा उपलब्ध असेल. या परिसरातच हे फिनिशिंग काउंटर्स (Finishing Counters) उभारले जातील. साधारणपणे कोणत्या पदार्थांना जास्त मागणी आहे, त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे सुविधा सुरु करण्यात येईल. जेव्हा फूड डिलिव्हरी पार्टनरकडून पिक-अप केलं जाईल तेव्हा ते निर्जंतुक केलेलं आणि गरम असेल याची खात्री केली जाईल असंही झोमॅटोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लवकरात-लवकर डिलीव्हरी देणारं रेस्टॉरंट कोणतं हे झोमॅटोवर सगळ्यांत जास्त वापरलं जाणारं फीचर आहे. त्यावर आधारितच ही इन्स्टंट फूड डिलिव्हरी सुरु करण्यात आल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. ऑर्डर केल्यानंतर ते मिळेपर्यंत अर्धा तास लागणं हे आता कालबाह्य होत चाललं आहे. आम्ही ते हद्दपार केलं नाही तर आणखी कोणीतरी करेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात १० मिनिटांत ऑर्डर मिळण्यासाठी काही अटी असतील. झोमॅटोच्या या नव्या १० मिनिट्स फूड डिलिव्हरी कसा प्रतिसाद मिळतो, हे बघणं महत्त्वाचं आहे.