scorecardresearch

TCS मधली नोकरी सोडल्यानंतर इंजिनिअर बनला झोमॅटो डिलिव्हरी बॉय, म्हणाला, “कित्येक ग्राहक…”

हातात चांगली नोकरी असली की, चांगल्या संधीची प्रत्येक जण वाट पाहात असतो. मात्र काही जणांना जगावेगळं करण्याचा ध्यास असतो.

zomato
TCS मधली नोकरी सोडून इंजिनिअर बनला झोमॅटो डिलिव्हरी बॉय, म्हणाला, "कित्येक ग्राहक…" (Photo- Reuters/प्रातिनिधीक फोटो)

हातात चांगली नोकरी असली की, चांगल्या संधीची प्रत्येक जण वाट पाहात असतो. मात्र काही जणांना जगावेगळं करण्याचा ध्यास असतो. त्यामुळे मोठा निर्णय घेताना मागे पुढे पाहात नाही. काहीतरी वेगळं करण्याची संधी सोडत नाहीत. अशीच काहीसी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. टीसीएसमध्ये काम करणारे श्रीनिवासन जयरामन यांनी नोकरी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत दाखल होण्याचा निर्णय घेतला. पण त्या कंपनीत जाण्यापूर्वी त्याच्याकडे एक आठवड्याचा अवधी होता. चेन्नईस्थित सॉफ्टवेअर इंजिनिअरने या कालावधीत नवीन कौशल्ये शिकण्याचा आणि या काळात आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. तसेच झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून अर्धवेळ नोकरी करण्याचे ठरवले. या कार्यकाळात त्याला आलेले अनुभव त्याने LinkedIn वर शेअर केले आहेत.

“काही वेळा हॉटेल आणि डिलिव्हरी लोकेशनमधलं अंतर खूपच जास्त असतं. मला एकदा रेस्टॉरंटपासून तब्बल १४ किलोमीटर दूर असणारी ऑर्डर मिळाली होती. काही भागांतून भरपूर ऑर्डर मिळत असतील, असं काही जणांना वाटत असतं. पण तसं काही नसतं. अशा भागांमधून मला कमी ऑर्डर मिळाल्या. बरेचसे ग्राहक त्यांचं नेमकं लोकेशन देत नाहीत किंवा त्यांचा फोन नंबर अपडेट करत नाहीत. तुम्ही परिसरात नवे असल्यास रेस्टॉरंट शोधण्यात अडचणी येतात. गुगल मॅप्सचा आधार घेऊनही रेस्टॉरंट्सचा पत्ता लगेच सापडत नाही. कधीकधी ३ तासांत केवळ तीनच ऑर्डर मिळतात. पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळेही बराच त्रास होतो. मी काही ठिकाणी वाचलं, की तुम्ही पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मदत करणार आहात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे” असं श्रीनिवासन जयरामननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ही पोस्ट सध्यो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

WI Cricket Tour: मैदानात भारतीय कर्णधाराला झाली होती गंभीर दुखापत, ६० वर्षांनंतर डोक्यातली मेटल प्लेट काढली

“काही जणांना वाटतं हे काम खूप सोपं आहे. तर काही जणांना काम अपमानास्पद वाटतं. हे काम करताना माझ्या कुटुंबानं मला विरोध केला होता. पण तुमचं कामावर प्रेम असेल तर तुम्हाला अपमानास्पद वाटत नाही. जे लोक हे काम करतात त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो”, असंही जयरामनने पुढे लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It professional becomes zomato delivery boy and share challanges rmt