Marathi Song Viral Video: मराठी भाषेच्या मुद्दावर सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करण्याचा किंवा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णायाला महाराष्ट्रात कडाडून विरोध दर्शवला. सोशल मीडियावर हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये होणारे वाद सतत चर्चेत येत आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेतच बोला असा आग्रह करताना दिसत आहेत तर महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणार नाही असे म्हण अनेक हिंदी भाषिकांचे व्हिडिओ चर्चेत येत आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी अस्मिता जपणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सोशल मीडियावर सध्या इटालियन महिलांचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांनी वाजले की बारा हे मराठी गाणे गायले आहे. मराठी भाषा फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादीत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे हे दर्शवणारा व्हिडिओ पाहून महाराष्ट्रायांचा ऊर अभिमानाने भरून येईल.
random_90s_memories नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तीन इटालयिन महिला एका समुद्रकिनारी रेतीवर बसलेल्या दिसत आहे. मागे समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळत आहे. महिला कॅमेऱ्यासमोर बसून वाजले की बारा हे मराठी गाणे आनंदाने आणि उत्साहाने गात आहे. इटालियन महिलांना मराठी गाण्याचे बोल व्यवस्थित पाठ आहेतच पण त्या शब्दांचा उच्चार देखील अचूकपणे करत आहे. एवढंच नाही तर त्यांनी गाण्याची चाल देखील अचूकपणे सादर केली आहे. विदेशी महिलांना मराठी गाणे गाताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. महाराष्ट्रीय लोकांनी महिलांचे कौतुकही केली.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”इटलीत मराठीचा डंका, इटालियन महिलांनी गायले मराठी गाणे वाजले की बारा…”
‘वाजले की बारा’ हे गाणं २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नटरंग’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालं. अजय-अतुल यांचं संगीत, रेश्मा सोनावणे यांचा दमदार आवाज दिला आहे. या गाण्याला पारंपरिक लावणीच्या पार्श्वभूमीमुळे हे गाणं आजही लोकांच्या हृदयात ताजं आहे. इटालियन महिलांनी हे गाणं फक्त म्हटलं नाही, तर त्यामागील उर्जा आणि लय जाणून ते तितक्याच उत्साहाने सादर केलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, मराठी संगीताची गोडी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचत आहे.
या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. अनेकांनी याला “मराठी संस्कृतीचं जागतिक दर्शन” असंही म्हटलं आहे.
एकाने कमेंट करत म्हटलं की,”बोला…जय महाराष्ट्र”
दुसऱ्याने लिहिले की, “कदाचित त्यांना महाराष्ट्र मध्ये जॉब लागला असेल… म्हणून येन्याच्या आधीच तयारी करत असतील…”
हा व्हिडिओ मराठी प्रेक्षकांसाठी एक अभिमानाचा क्षण ठरतोय, कारण स्थानिक लोककलेला मिळणारी ही जागतिक दाद निश्चितच गौरवाची आहे.