Italy PM Ex Partner Calls Collegues For Group Sex: इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी आपल्या १० वर्षांच्या नात्याला पूर्णविराम देत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जॉर्जिया मेलोनी यांचा पत्रकार जोडीदार अँड्रिया जिआमब्रुनो याने केलेल्या अश्लील शेरेबाजीमुळे त्याच्यावर टीका होत होती. त्यांनतर मेलोनी यांना सुद्धा अनेकांनी लक्ष्य केले होते. शेवटी मागील महिन्यात मेलोनी यांनी जिआमब्रुनोच्या मतांवरून आपली परीक्षा केली जाऊ नये, भविष्यात सुद्धा आपण त्याच्या वागणुकीबद्दल उत्तरं देणार नाही असे पत्रकारांना सांगितले होते.

जॉर्जिया मेलोनी व जिआमब्रुनो यांचं रिलेशन कसं होतं?

२०१४ मध्ये एका टीव्ही स्टुडिओमध्ये जॉर्जिया मेलोनी व पत्रकार अँड्रिया जिआमब्रुनो यांची भेट झाली होती. १० वर्षांपासून एकत्र असणाऱ्या या जोडप्याला ७ वर्षांची मुलगी (जिनिव्हा) आहे. जिआमब्रुनो हा MFE मीडिया ग्रुपचा एक भाग असलेल्या Mediaset वर “Diario del Giorno” हा शो होस्ट करतो. याच शोच्या ऑफ एअर असणाऱ्या एका क्लिपमध्ये त्याने महिला सहकाऱ्यांशी बोलताना अश्लील शेरेबाजी केली होती ज्यामुळे तो वादात अडकला होता.

जिआमब्रुनोने अश्लील शेरेबाजी करत काय म्हटले?

व्हायरल व्हिडिओमध्ये तो महिला सहकाऱ्यांच्या मांडीला स्पर्श करताना व असभ्य भाषेत बोलत होता, “मी तुला आधी का भेटलो नाही?”असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटल्याचे वृत्त राऊटर्सने दिले आहे. गुरुवारी प्रसारित झालेल्या दुसर्‍या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये, जिआमब्रुनो आपल्या महिला सहकाऱ्यांशी बोलताना असेही म्हणाला होता की, जर मी ग्रुप सेक्स केला तर तुम्हीही त्याचा भाग होऊ शकता.

हे ही वाचा << इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी १० वर्षांचं नातं संपवलं! G20 वेळी मोदींसह फोटोमुळे झाली होती तुफान चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशाप्रकारे वादात अडकण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही कारण यापूर्वी सुद्धा त्याने एका सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अनेकांनी पीडितेला दोषी ठरवणाऱ्या कमेंट्स लाईव्ह टीव्हीवर केल्या होत्या. महिला जास्त नशेत न राहता बलात्कार टाळू शकतात. तुम्हाला मद्यपान करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यावर कोणालाच आक्षेप नाही पण तुम्ही जास्त पिऊन तुमचं भानच हरपून बसलात तर तुम्हाला समस्या येणारच आहेत, असे जिआमब्रुनो म्हणाला होता.