scorecardresearch

VIRAL VIDEO : पाण्यामध्ये पोहणाऱ्या मगरीवर जग्वारचा हल्ला, नदीत उडी घेत मान जबड्यात धरून बाहेर काढलं

एका जग्वारने मगरीची केलेली शिकार मोठी थरारक आहे. या दोघांमधल्या खतरनाक झुंजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागलाय.

VIRAL VIDEO : पाण्यामध्ये पोहणाऱ्या मगरीवर जग्वारचा हल्ला, नदीत उडी घेत मान जबड्यात धरून बाहेर काढलं
(Photo: Twitter/ TheFigen)

जंगलाचं विश्व मोठं रंजक असतं. इथे एका प्राण्याला जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला मारावे लागते. मांसाहारी प्राणी तर सतत आपल्या शिकारीच्या शोधात असतात. वाघ, सिंह तसेच इतर मांसाहारी प्राणी मोठ्या थरारक पद्धतीने शिकार करतात. त्यांच्या याच शिकारीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका जग्वारने केलेल्या शिकारीचा आहे. एका जग्वारने मगरीची केलेली शिकार मोठी थरारक आहे.

मगर हा समुद्रातील एक शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. वेळप्रसंगी तो अवाढव्य अशा दिसणाऱ्या शार्क माशासोबतही दोन हात करु शकतो. त्यामुळे अशा खतरनाक प्राण्याशी पंगा न घेणंच योग्य. परंतु याच मगरीशी एका जग्वारने भिडण्याची हिंमत दाखवली. जग्वार हा सुद्धा धोकादायक मार्गाने शिकार करण्यासाठी देखील ओळखले जातात. जग्‍वार हा चित्ता आणि वाघ यांच्‍या कुळातील एक प्राणी आहे. जर हे दोन्ही खतरनाक प्राणी एकमेकांसमोर आले तर काय चित्र असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. या दोघांमधल्या खतरनाक झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीकिनारी मगर आराम करताा दिसतेय. पण म्हणतात ना, आराम हराम है! नदीकिनारी आराम करत असलेल्या मगरीसोबत पुढे काय होणार आहे, याची तिला साधी कल्पना सुद्धा नव्हती. एक जग्वार जंगलात शिकारीच्या शोधात इकडे-तिकडे भटकतो आणि शेवटी नदीच्या काठी येतो. तिथे त्याला एक मगर पाण्यात पोहताना दिसते. त्यानंतर जग्वार क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी मारतो आणि मगरीला पकडतो. तिच्यावर हल्ला करून जग्वार तिला जंगलात घेऊन जातो. मगरीवर हल्ल्ल्यासाठी जग्वारने सुरूवातीला रणनिती आखली होती. पुरेपुर तयारी करून मगच तो मगरीवर हल्ला करतो. सुरूवातीला तो मगरीवर सर्व लक्ष केंद्रित करून नदीजवळील फांद्या आणि झुडपांमध्ये लपलेला दिसतो. मग योग्य वेळ पाहून पाण्यात पोहणाऱ्या मगरीवर उडी मारतो.

आणखी वाचा : माणुसकी अजूनही जिवंत आहे! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हत्तीण बाळाला जन्म देत होती, कळपाने असा साजरा केला क्षण, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

४२ सेकंदांच्या क्लिपमध्ये दोन क्रूर वन्य प्राणी जगण्यासाठी धोकादायक लढाई लढताना दिसतात. जग्वार ही लढाई जिंकतो. मगरीची मान त्याच्या जबड्यात पकडतो आणि नदीतून बाहेर पडतो. सोमवारी फिगेन नावाच्या युजरने शेअर केलेला हा व्हिडीओ वाहसी हयातलर नावाच्या दुसऱ्या युजरने दोन वर्षांपूर्वी ट्विटरवर पोस्ट केला होता. पण आता तो पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. “जॅग्वारच्या जबड्याची ताकद अप्रतिम आहे. सर्वात मजबूत.”, “जबडा आणि मान!! आश्चर्यकारक!” “अरे, रात्रीचे जेवण आणि सामान. खरंच भूक लागली असेल,” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओखाली येताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jaguar attacks crocodile swimming in water internet says what a power watch shocking viral video prp