scorecardresearch

Premium

एवढं मनमुराद जगता यायला हवं! या महिलेचे अमिताभ बच्चनही झाले फॅन, VIDEO पाहून कराल कौतुक

Viral video: हॉट सीटवर जाण्याची कोणतीही अपेक्षा नसताना, तिचा नंबर लागला तिनं १२ प्रश्नांची उत्तर दिली आणि तिच्या निरागसतेनं सगळ्यांची मनही जिकंली.

‘Jai Ho KBC, Mera Ho Gyaa’ Woman’s Hilarious Interaction With Amitabh Bachchan
या महिलेचे अमिताभ बच्चनही झाले फॅन

Viral video: ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १५ च्या अलीकडील एपिसोडने सर्वांनाच पोट दुखेपर्यंत हसवलं आहे. या एपीसोडची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अलोलिका भट्टाचार्जी गुहा नावाच्या एका महिला स्पर्धकाने तिच्या बोलण्यानं सर्वांनाच वेड लावलं आहे. एवढंच नाही तर स्वत: अमिताभ बच्चन हे सुद्धा तिचे फॅन झाले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्की हसू येईल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात अलोलिका तिच्या पहिल्या फ्लाइट, हॉटेलमध्ये राहणे, आर्थिक स्थिती आणि फिटनेस प्रवास या सर्व गोष्टी ‘जय हो केबीसी’ म्हणत गमतीशीरपणे शेअर करते. यामुळे प्रेक्षक आणि बिग बी पोट धरुन हसत आहेत. या शोमध्ये तिने केबीसीने तिची स्वप्ने पूर्ण करण्यात कशी मदत केली हे व्यक्त तीनं केले. हॉट सीटवर जाण्याची कोणतीही अपेक्षा नसताना, तिचा नंबर लागला तिनं १२ प्रश्नांची उत्तर दिली आणि तिच्या निरागसतेनं सगळ्यांची मनही जिकंली.

memory
तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी वारंवार विसरता? विसरण्याची सवय सामान्य आहे की गंभीर? वाचा सविस्तर…
Uddhav thackeray in dharavi
“…तर जनतेला त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल”, धारावीतून उद्धव ठाकरेंचा पुन्हा एल्गार
What should a person choose in the end To live in happiness as much as possible or to be happy in living as much as possible
सांधा बदलताना : समाधान!
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil Challenge
“ओबीसीतून आरक्षण मागता आणि मागासवर्गीयांची लायकी…”, छगन भुजबळांची खरमरीत पोस्ट

अमिताभ बच्चनही झाले फॅन

अलोलिकाने हॉट सीटवर जाण्याची कोणतीही आशा नसल्याची कबुली दिल्याने ६९वा भाग हास्याने गाजला. एवढंच नाहीतर बिग बींनी त्यांच्या अधिकृत एक्स प्रोफाइलवर या भागाची झलक शेअर केली. त्यांनी पोस्टला ‘जय हो’ असे कॅप्शन दिले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “इथं पळत राहिलात तरच टिकाल” खरे मुंबईकर असाल तरच कळतील ‘या’ VIDEO मागच्या भावना

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेहमीच असे काही ना काही तरी लोक शेअर करत असतात. युजर्सना ते आवडले तर लगेच गोष्टी व्हायरल होतात. हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल झाला आहे.तापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jai ho kbc mera ho gyaa womans hilarious interaction with amitabh bachchan leaves internet in splits video viral srk

First published on: 01-12-2023 at 16:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×