Mumbai video viral: मुंबईकरांचं जीवन हे धावपळीचं असतं. मुंबई हे सतत सुपरफास्ट धावत असते. त्यामुळे इथले मुंबईकरही प्रचंड वेगाने धावत असतात. मुंबईकर नेहमी घाईत असतो. प्रत्येक काम हातावेगळं पटकन कसं करता येईल यावर भर असतो. शांतपणे, निवांतपणे काम करणं मुंबईकरांच्या रक्तात नाही. मग ऑफिसचं काम असो, घरचं काम असो की प्रवास… मुंबईकर सतत घाईत आणि गडबडीतच असतो. त्यातही लोकलचा प्रवास असेल तर बघायलाच नको. गर्दीच्यावेळी मुंबईकरांची झुंबड स्टेशनवर उडालेली असते आणि गाडी येताच ज्या पद्धतीने लोक गाडीत जाण्याचा प्रयत्न करतात ते पाहून नवख्या माणसाच्या काळजात धस्स होईल. मुंबईकर कसा नेहमी धावतच असतो याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यावर तुम्हीही अचंबित व्हाल.

“इथं पळत पाहिलात तरच टिकाल”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आजच प्रवास करतोय काय? मुंबईत नवीन आलाय का? अशी शेरेबाजी तर प्रत्येक मुंबईकराच्या तोंडात असते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रेल्वे स्टेशनच्या एका ब्रिजवरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर लिहलं आहे “इथं पळत राहिलात तरच टिकाल” खरे मुंबईकर असाल तरच तुम्हालाही या व्हिडीओमागच्या भावना कळतील.

तसेच व्हिडीओला कॅप्शनही देण्यात आलं आहे. “मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला ‘मुंबई’च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. पुल देशपांडे”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बहिणीच्या लग्नात मेहुणीनं साधला डाव! नवरदेवाच्या गळ्यात हार घालायचा प्रयत्न अन्….VIDEO पाहून बसेल धक्का

हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण त्यात स्वत:ला शोधत आहे. कारण प्रत्येक मुंबईकर या गर्दीतून रोज वावरत असतो. प्रवास करतो, ऑफिस गाठतो. हा व्हिडीओ aamchi_mumbai या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader