मागील काही दिवसांपासून सोशल मीडीयावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये कधी भेळसाठी वापरण्यात येणारे कुरमुरे बनवतानाचा एक किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडा येथील एक नारळपाणी विक्रेता नारळावर नाल्यातील पाणी शिंपडताना व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच हा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचंही नेटकरी म्हटलं होतं.

सध्या जालना शहरातील अशीच एक धक्कादायक समोर आली आहे. ज्यामध्ये पाल असलेल्या बाटलीतील पाणी पिल्यामुळे एका मुलीला विषबाधा झाल्याचं समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जालना शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात घडली आहे. येथील एका मुलीने पाणी पिल्यानंतर ती ज्या बाटलीत पाणी पिली होती त्यामध्ये पाल असल्याचे तिला समजले. जेव्हा तिला ही गोष्ट समजली तेव्हा तिने तिच्या इतर मैत्रिणींना तिने या घटनेची माहिती दिली. पण ही घटना ऐकताच तिच्या इतर चार मैत्रिणींना मळमळ, उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.

हेही पाहा- शिक्षकांपुढे ChatGPT ही फेल! ७ वीच्या विद्यार्थ्याने AI चा वापर करुन गृहपाठ केला पण ‘त्या’ एका चुकीमुळे शिक्षकांना सापडला

पाहा व्हिडीओ –

हेही पाहा- मोबाईल चोरीला गेलाय? आता घाबरण्याचं कारण नाही, IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला Video पाहा आणि निश्चिंत राहा

दरम्यान, मुलींना त्रास होत असल्याची माहिती परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना समजताच त्यांनी तातडीने या मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि मुलींवर उपचार सुरु केले. सध्या या चारही मुलींची तब्येत स्थिर असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरु असल्याची माहिती परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यां पार्वती लोटे यांनी दिली आहे. ही घटना समोर येताच विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजंच असल्याचं नागरिक म्हणत आहेत.