सध्या जगभरात chatgpt या चॅटबॉटची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अनेकजण या चॅटबॉटला टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. तर हा चॅटबॉट नोकरदारांसाठी धोका असल्याचंही म्हटलं जात आहे. या नाविन्यपूर्ण चॅटबॉटचा वापर करून, लोकांना कोणत्याही प्रश्नाची उत्तरे सहज मिळू शकतात. आजकाल, लहान मुले असो किंवा प्रौढ, प्रत्येकजण त्यांचे काम सोपे करण्यासाठी ChatGPT चा वापर करतो. पण आता चक्क शाळकरी मुलंदेखील त्यांचा गृहपाठ करण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करत असल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मुलाला ChatGPT चा वापर करुन गृहपाठ लिहिताना शिक्षकांनी पकडलं आहे. अॅक्टीव्ह इंटरनेट कनेक्शन आणि स्मार्टफोन किंवा लॅपटॉप ही साधणं जवळ असणारी कोणीही व्यक्ती ChatGPT चा वापर करु शकते. ChatGPT चा वापर करुन तुम्ही कोणत्याही विषयावर चांगले लिहिलेले निबंध गोळा करू शकता. पण या चॅट जीपीटीचा शाळकरी मुलाने वापर केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोशन पटेल नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने एक याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने ७ वीच्या वर्गात शिकणाऱ्या त्याच्या पुतण्याने शिक्षकांना फसवण्यासाठी आणि इंग्रजी गृहपाठ पूर्ण करण्यासाठी चॅटबॉटचा वापर केल्याचं सांगितलं आहे. पण त्या मुलाच्या दुर्दैवाने शिक्षकांनी त्याने ChatGPT च्या मदतीने गृहपाठ केल्याचं ओळखलं. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेही पाहा- मोबाईल चोरीला गेलाय? आता घाबरण्याचं कारण नाही, IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला Video पाहा आणि निश्चिंत राहा व्हायरल होत असलेल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "माझा चुलत भाऊ अर्जुन हा सातवीच्या वर्गात शिकत असून तो इंग्रजी गृहपाठ ChatGPT वापरून करताना पकडला गेला. विशेष म्हणजे मुलाने चॅटजीपीटी वापरून गृहपाठ केला आणि शिक्षकांना दाखवला, परंतु त्यात असे एक वाक्य होते की ते वाचून शिक्षकाने त्याला लगेच पकडले. कारण या विद्यार्थ्याने नकळत त्या गोष्टीदेखील गृहपाठात लिहिल्या ज्या चॅट जीपीटीने त्याच्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रिया होत्या. चॅट जीपीटीच्या प्रतिक्रियाही त्याने जशाच्या तशा लिहिल्यामुळे शिक्षकांनी त्याने स्वत:हून गृहपाठ केला नसल्याचं ओळखलं. हेही पाहा- कानाजवळ मोबाईल, एका बाजूला पाय; फोनवर बोलण्याच्या नादात त्याने बाईकचा हॅंडलदेखील सोडला, थरारक Video व्हायरल ही घटना ट्विटरवर शेअर करताच ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अनेक नेटकऱ्यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही मुलं खूप स्मार्ट पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, असं म्हटलं आहे. तर काहींनी हे मुलांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरु शकतं असंही म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने "काय कॉपी करायचं हे देखील त्याला व्यवस्थित समजलं नाही, त्यामुळे पकडला गेला" अशी कमेंट केली आहे. हे ट्विट आतापर्यंत १.२ मिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.