‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक असते,’ असं वाक्य सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं, पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्रास धूम्रपान करतात. धूम्रपानाचा परिणाम केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही, तर तो मानसिक आरोग्यावरही होत असतो. पण मोठ मोठ्या कंपन्यात काम करणारे अनेक कर्मचारी कामाचा ताण कमी करण्यासाठी सर्रास धूम्रपान करतात. या सुशिक्षित कर्मचाऱ्यांना धूम्रपानाचे दृष्परिणाम ठाऊक असतात पण तरीही त्याकडे सोयीस्कर कानाडोळा करून कर्मचारी सिगारेटचे झुरके ओढतात.
फिगरपेक्षा ‘त्या’ फिगरकडे जास्त लक्ष द्या, सौंदर्यवतीच्या उत्तराची जगभरात चर्चा
कर्मचाऱ्यांना या वाईट सवयीपासून परावृत्त करण्यासाठी जपानमधल्या ‘पिआला’ या ऑनलाइन कॉमर्स कंपनीनं कर्मचाऱ्यांपुढे मोठी ऑफर ठेवली आहे. जो कर्मचारी धूम्रपान सोडेल, त्यांना इतरांपेक्षा सहा अधिक सुट्ट्या देण्यात येणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलं आहे. पिआलाचे प्रवक्ते हिरोताका यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली. पिआलाचे ऑफिस २९ व्या मजल्यावर आहे. येथील अनेक कर्मचारी सिगारेट ओढण्यासाठी २९ मजले उतरून खाली जातात, यात त्यांची किमान १०-२० मिनिटे वाया जातात. धूम्रपानाने फक्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरच नाही तर कंपनीच्या उत्पादन क्षमतेवरदेखील परिणाम होत असल्याचं कंपनीच्या लक्षात आलं म्हणूनच कंपनीनं कर्मचाऱ्यांपुढे अधिक सुट्ट्याची ऑफर ठेवली.
कदाचित सुट्ट्याचं आमिष दाखवल्यावर तरी कर्मचारी धूम्रपान सोडतील अशी कंपनीला आशा आहे.