एका ५० वर्षाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदललून सांगितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाय या व्यक्तीने आपण पोलिस असल्याचही मुलीच्या घरच्यांना सांगितलं होतं. मात्र, त्याचा हा खोटारडेपणा उघडकीस आल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी बरबाद होण्यापासून बचावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील बोकारो येथील ५० वर्षाच्या व्यक्तीने आपली ओळख लपवत अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला होता. यासाठी त्याने आपलं नावं, धर्म नोकरी याबाबतची सर्व खोटी माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यामुळे मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. लग्नाची सर्व तयारी झाली लग्नादिवशी वधू-वर स्टेजवर आले. दोघांनी एकमेकांना पुष्पहारही घातले. इतक्यात पोलिसांना एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा- नवरी न मिळे नवऱ्याला! ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद

पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आरोपीचा पर्दाफाश झाला. शिवाय अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे वय ५० वर्ष असून, त्याने आपला धर्म आणि खरं नाव लपवल्याचं पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना सांगताच त्यांना धक्का बसला. शिवाय या आरोपीने याआधीही अशाच प्रकरणात तुरुंगाची हवा खाल्ली असल्यांचंही पोलिसांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे लग्न मंडपातून पोलिसांची नजर चुकवत हा आरोपी फरार झाला. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असता त्यामध्ये काही बनावट कागदपत्र आणि पोलिसांचा ड्रेस सापडला आहे.

हेही वाचा- किळसवाणा प्रकार! विमान प्रवासादरम्यान महिलेच्या जेवणात आढळला दात; कंपनीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

मुलीच्या आईशी वाढवली ओळख –

या आरोपीची आणि अल्पवयीन मुलीच्या आईची ६ महिन्यांपूर्वी एका बँकेत भेट झाली होती. यावेळी त्याने आपले नाव संजय बेसरा असल्याचं सांगितलं होतं. शिवाय मुलीच्या आईला ज्या कर्जाची गरज होती ते कर्ज पास करून देतो असं सांगितलं. महिलेचे कर्ज पास झाल्यानंतर आरोपी सतत मुलीच्या आईला फोन करु लागला. त्याचं या मुलीच्या घरी येणे- जाणं वाढलं त्यानंततर आरोपीने मुलीच्या आईला आपणाला तुमच्या मुलीशी लग्न करायचं असल्याचं सांगितलं. गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांनीही लग्नाला होकार दिला. मात्र, अखेर आरोपीचा भांडाफोड झाल्यामुळे मुलीसोबत होणारा अनर्थ टळला.