शाळेतील दिवस किती सुंदर होते ना! विशेषत: तेव्हा जेव्हा अभ्यासाचे फार कसली चिंता नव्हती. छान-छान गोष्टी शिकवत असे, सुंदर कविता शिकवत असे. अनेकदा कवितांची चाल लावण्यापासून त्यावर नृत्य करण्यापर्यंत सर्वकाही शाळेतील शिक्षक शिकवत असे. वर्गातील मित्र-मैत्रिणींबरोबर या कविता म्हणायला आणि गोष्टी सांगण्याची मज्जा काही वेगळी होती. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यात एका शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात बडबडगीत शिकवत आहे. व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस नक्की आठवतील.

निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना दिले जातेय शिक्षण

हा व्हिडिओ जामखेड येथील धनरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. व्हिडीओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘एक होता डोंगर, डोंगरावर झाड..!’ हे निसर्गावर आधारित बडबडगीत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या गाण्याद्वारे विद्यार्थ्यांना झाडांची -पक्ष्यांची माहिती सांगत आहे. कविता शिकवण्याबरोबर त्यावर नृत्य करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना शिकवत आहे.

हेही वाचा – तीन थरांचा मानवी मनोरा रचून गोविंदांनी सादर केला अफझल खानाच्या वधाचा प्रसंग, Video Viral पाहून अंगावर येईल काटा

हेही वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रेने लाडक्या बाप्पासाठी गायले गाणे, तुम्ही ऐकले का? पाहा Viral Video

काय आहे ही कविता

एक होता डोंगर
डोंगरावरती झाड
झाडाला मूळ
मुळावरती खोड
खोडाला फांद्या
फांद्यांना पान
पानात फुल
फुलाला फळ
झाडावरती चिमणी
चिमणीचे घरटं
घरट्यात अंडे
अंड्यात पिल्लू
पिल्लू करत चिव चिव
चिव चिव चिव चिव
हिरवळ बाजूला
हिरवळ बाजूला

हेही वाचा –“स्माईल प्लिज”, वडिलांच्या मागे दुचाकीवर बसून गोंडस चिमुकली फोटोसाठी देतेय भन्नाट पोझ, Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

व्हिडिओ lahuborate या पेजवर शेअर केलेल आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” एक होता डोंगर | बडबडगीत “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही या लहू बोराटे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा व्हिडिओ चर्चेत आला होता जेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना “अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ” ही कविता शिकवली होती. विद्यार्थ्यांना मजेशीर पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शिक्षकांचे सोशल मीडियावर कौतूक केले जाते आहे.