मॅकडॉनल्डमध्ये जाणे आज काल सामन्य गोष्ट झाली आहे. येथील विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी लोक येथे आवडीने येतात. दरम्यान मॅकडॉन्ल्डमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी मॅकडोनाल्डचे चिकन नगेट्समुळे ऑलिव्हिया कॅराबॅलो नावाच्या ४ वर्षांच्या मुलीला गंभीरपणे भाजल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे आणि यासाठी त्यांनी मॅकडॉनल्डविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणात दक्षिण फ्लोरिडा्या ज्युरीने या कुटुंबाला $800,000 नुकसान भरपाई देण्याचे आदेश मॅकडोनाल्डला दिले आहेत.

मॅकडॉनल्डच्या चिकन मॅक-नगेट्समुळे ४ वर्षीय मुलीला बसला चटका

अहवालानुसार, युनायडेट स्टेट्समधील हे प्रकरण आहे. २०१९ मध्ये ऑलिव्हिया काराबॅलोला भाजले होते, जेव्हा ती फक्त 4 वर्षांची होती. फोर्ट लॉडरडेलजवळील टॅमरॅक येथील मॅकडोनाल्डच्या बाहेर ही घटना घडली होती फ्लोरिडामधील ब्रॉवर्ड शहरात राहणाऱ्या या मुलीची आई फिलाना होम्स(Philana Holmes) आणि वडिल हंबरटो काराबॅलो एस्टेवेझ (Humberto Caraballo Estevez) यांनी मॅकडोनाल्ड आणि त्यांची फ्रँचायझी अपचर्च फूड्सविरोधात १५ हजार डॉलर्सपर्यंत नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. त्यांचे म्हणणे होते की, ”मुलीला ‘हॅपी मील’ दिले होत. त्यात गरम चिकन नगेट्स देखील होते, जे मुलीच्या मांडीवर पडले आणि तिला गंभीररिच्या भाजले (सेकंड डिग्री).

बुधवारी दोन तासांपेक्षा कमी वेळ विचारविनिमय केल्यानंतर ज्युरीने हा निर्णय दिला. मुलाचा त्रास लक्षात घेता, $800,000 डॉलरची रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले. ज्युरीने निर्णय दिला की मॅकनगेट्स सुरक्षितपणे सर्व्ह करावे.

हेही वाचा – ChatGPTमुळे गमावली नोकरी, 3 महिन्यांपासून बेरोजगार; लेखिका आणि स्टँड-अप कॉमेडियनने केला धक्कादायक खुलासा

निकालाने कुटुंब आनंदी

ऑलिव्हियाची आई फिलाना होम्स म्हणाली: “मला आनंद झाला की ज्युरीने आमचा आवाज ऐकला आणि योग्य निर्णय दिला.” मला कोणतीही अपेक्षा नव्हती, त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे ती म्हणाला.

हेही वाचा – स्टार्टअप कंपनीने काढली भरती, २ दिवसात आले ३००० अर्ज, असे काय खास आहे या नोकरीमध्ये, जाणून घ्या

असा होता दोन्ही बाजूचा युक्तीवाद

रिपोर्टनुसार, मुलाच्या आईचे म्हणणे आहे की” ऑलिव्हिया आठ वर्षांची झाली आहे. ती तिच्या भाजलेली खुण घालवण्याबाबत विचारते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅकडोनाल्डच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, जखम बरी होण्यास सुमारे तीन आठवडे लागले, परंतु आता ती बरी आहे. मुलीच्या आईला जखमेच्या डागाची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी अजूनही मॅकडोनाल्डला जायला सांगते.”