Dangerous stunt video at Kalu waterfall : पावसाळा सुरू झाला की लोक धबधब्यांवर मोठ्या संख्येने गर्दी करतात. आजकाल जवळपास प्रत्येक धबधब्यावर हेच चित्र पाहायला मिळते आहे. पण बेपर्वा वर्तन आणि सावधगिरी न बाळगल्याने अनेकदा अशा ठिकाणी अपघात होतात ज्यामुळे लोक आपला जीव गमावतात. पावसाळा सुरू झाल्यापासून अशा कित्येक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच काही दिवसांपूर्वी काळू धबधब्यावरून एक तरुण पडता पडता वाचला. दोन्ही घटनांचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच मोठी दुर्घटना घडली तरी काळू धबधब्यावरील पर्यटकांची गर्दी ओसरली नाही. अजूनही मोठ्या संख्येने लोक तेथे भेट देत आहे. काही पर्यटक उत्साहाच्या भरात जीव धोक्यात टाकताना दिसत आहे. नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण धबधब्याजवळ एक खडकावर उभा राहून नाचत आहेत. काळू धबधब्यावरचा थरार व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

काळू धबधब्यावर धोकादायकपणे नाचतोय तरुण ( Boy dangerous dance at Kalu Waterfall)

बधब्यांवर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पावसाळ्यात पाण्याचा जोर अचानक वाढू शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते. अनेक ठिकाणी मद्यपान करून पाण्यात उतरणे, फोटो किंवा व्हिडीओ काढताना तोल जाऊन पडणे, आणि प्रवाहाचा अंदाज न येणे यामुळे दुर्घटना घडतात. काही जण तर प्रवाहात ओढले जाऊन गंभीर जखमी होतात, तर काही जणांना प्राणही गमवावा लागतो. तसेच सतत पाऊस पडत असतो त्यामुळे तेथील खडक गुळगुळीत होतात त्यामुळे खडकांवरून चालतान सावकाश चालावे लागते. ओलसर खडकावरून पाय घसरून धबधब्यात पडल्याचे अनेक धक्कादाय व्हिडिओ समोर आले आहेत तरीही लोक तीच चूक करतात अन् स्वत:चा जीव धोक्यात घालातात. अशाच प्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण काळू धबधब्याजवळ अत्यंत धोकादायक पद्धतीने नाचताना दिसत आहे.

धबधब्यावर तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी (Young woman’s life-threatening stunt on a waterfall)

kiran_sabale_official नावाच्या इंस्टाग्रामवर पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पावसाळ्यात काळू धबधब्यावर पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो, त्यामुळे तिथे उभं राहणं सुद्धा खूप धोकादायक असतं. मात्र, या तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता धबधब्याजवळील एका खडकावर उभा राहून थेट डान्स करण्याचा धोका पत्करला आहे. त्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतू शकते. चूकनही त्याचा तोल गेला तर तो पाण्यात पडण्याचा किंवा खडकावर डोके आपटण्याचा धोका निर्माण होत असतानाही, त्याने हा स्टंट केला आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला. अनेकांनी अशा प्रकारच्या स्टंटवर नाराजी व्यक्त केली असून, इतर तरुणांनी अशी कृती करू नये, असं आवाहन केलं आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत “थोडक्यात वाचलास”, “अशा स्टंटमुळे मोठी दुर्घटना घडू शकते”, असे इशारे दिले आहेत. निसर्गाचा आनंद घेणं चांगली गोष्ट आहे, मात्र अशा स्टंटने जीव धोक्यात घालणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून सुद्धा वारंवार करण्यात येतं.

Live Updates