Kamala Harris Parents in Google’s Top Trending Topics : अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस ( Kamala Harris ) या डेमोक्रॅटिकच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हिलरी क्लिंटन यांच्यानंतर दुसऱ्यांदा उमेदवार असलेल्या कमला हॅरीस यांच्या आई वडिलांची चर्चा सध्या प्रचंड प्रमाणात होते आहे. गुगल ट्रेंड मधील टॉपच्या सर्चमध्ये कमला हॅरिस ( Kamala Harris ) यांचे आई वडील आहेत, यामागे नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

कमला हॅरिस यांचे आई वडील टॉप ट्रेंडमध्ये

कमला हॅरिस ( Kamala Harris ) या भारतीय वंशाच्या आहेत, त्यांना त्यांची आई श्यामला गोपालन यांची कायमच आठवण येते. तसंच आईने घडवलेले संस्कार त्यांना कायमच आठवतात. मला आईची आठवण रोज दिवसातून एकदा तरी येतेच असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. कमला हॅरिस यांनी हे वक्तव्य केल्यानंतर अमेरिकेतले लोक कमला हॅरिस यांचे आई वडील कोण आहेत हे गुगलवर सर्च करत आहेत. हा सर्च इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे की कमला हॅरिस यांचे आई वडील गुगलच्या टॉप ट्रेंडमध्ये आले आहेत. गुगल ट्रेंडच्या माहितीनुसार 200 K हून अधिक लोकांनी कमला हॅरिस आणि त्यांचे आई वडील यांच्याबाबत गुगलवरुन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Google's Top Trending Topics Kamala Harris Parents News in Marathi
कमला हॅरिस यांचे आई वडील गुगलच्या टॉप ट्रेंडमध्ये (फोटो सौजन्य-गुगल ट्रेंड्स )

PTI च्या वृत्तानुसार जो बायडेन यांनी जुलै महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर कमला हॅरिस यांचं नाव चर्चेत आलं. मला हे होणार असं वाटलं नव्हतं. काही अपेक्षा ठेवलेली नसताना मी स्पर्धेत आले आहे असं मत कमला हॅरिस यांनी व्यक्त केलं.

कमला हॅरिस नेमकं त्यांच्या आईबाबत काय म्हणाल्या?

कमला हॅरिस ( Kamala Harris ) म्हणाल्या, “माझी आई एकदम हुशार होती, तिची उंची पाच फूट होती पण तिची भाषा उत्तम होती. माझी आई श्यामला हॅरिस ही स्वतः एक आदर्श व्यक्ती होती. मला माझ्या आईची रोज आठवण येते. मला ठाऊक आहे ती स्वर्गातून माझ्याकडे पाहून नक्कीच मंद स्मित करत असेल. माझी अवघ्या १९ वर्षांची होती तेव्हा ती भारतातून कॅलिफोर्नियात आली. तिच्या हिंमतीची खरंच दाद द्यावी लागेल. ब्रेस्ट कॅन्सर बरा करणारी शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न माझ्या आईने उराशी बाळगलं होतं.”

श्यामला गोपालन आणि डोनाल्ड हॅरिस यांची भेट कशी झाली?

आईच्या आठवणीत कमला हॅरिस म्हणाल्या, “माझी आई माझ्यासाठी आदर्शवत होती. तिने आम्हाला उत्तम शिकवण दिली. अन्यायाला वाचा फोडा, त्याबद्दल तक्रार करु नका ही तिचीच शिकवण आहे. तसंच जी गोष्ट हाती घ्याल ती पूर्णत्वाला न्या हेदेखील आम्हाला आमच्या आईनेच शिकवलं. माझी आई खरंतर लग्न करण्यासाठी घरी म्हणजेच भारतात परतणार होती. पण जमैकामध्ये तिची भेट डोनाल्ड हॅरिस यांच्याशी म्हणजेच माझ्या वडिलांशी झाली आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न केलं.”

हे पण वाचा ट्रम्प अध्यक्ष झाल्यास गंभीर परिणाम; अधिकृत उमेदवारीच्या घोषणेनंतर कमला हॅरिस अधिक आक्रमक

कमला हॅरिस यांच्या आई वडिलांबाबत जाणून घ्या

कमला हॅरिस ( Kamala Harris ) यांची आई श्यामला गोपालन या कॅलिफोर्नियातील निष्णात ब्रेस्ट कॅन्सर सायंटिस्ट होत्या. वयाच्या १९ व्या वर्षी त्या भारतातून कॅलिफोर्नियाला आल्या. त्यांनी १९६४ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी केली. विद्यार्थी दशेत असतानाच श्यामला गोपालन आणि डोनाल्ड हॅरिस यांची भेट झाली. १९६३ मध्ये या दोघांनी लग्न केलं. या दोघांना दोन मुली झाल्या. मात्र कमला हॅरिस जेव्हा सात वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा म्हणजेच डोनाल्ड हॅरिस आणि श्यामला यांचा घटस्फोट झाला. श्यामला गोपालन यांचा मृत्यू २००९ मध्ये कर्करोगामुळे झाला. मृ्त्यूसमयी श्यामला गोपालन ७० वर्षांच्या होत्या.

डोनाल्ड हॅरिस कोण आहेत?

डोनाल्ड हॅरिस हे प्रख्यात अर्थतज्ज्ञ आहेत. स्टँडफोर्ड विद्यापीठात डोनाल्ड हॅरिस अर्थशास्त्र हा विषय शिकवत असत. १९७२ ते १९९८ या कालावधीत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. जमैका सरकारमध्ये ते अर्थविषयक सल्लागारही होते. त्यांनी अनेक पंतप्रधानांबरोबर ही जबाबदारी सांभाळली आहे.

कमला हॅरिस यांचे पती कोण आहेत, त्यांची मुलं काय करतात?

कमला हॅरिस ( Kamala Harris ) यांचे पती डग एमहॉप हे आहेत. गुरुवारीच त्यांच्या लग्नाचा १० वा वाढदिवस पार पडला. डग हा माझा उत्तम मित्र आणि चांगला नवरा आहे. कोल आणि एला या आमच्या मुलांचा तो बाबा आहे, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणत कमला हॅरिस यांनी त्यांचे पती डग एमहॉफ यांना शुभेच्छा दिल्या. जर कमला हॅरिस निवडून आल्या आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर त्यांचे पती डग एमहॉफ हे अमेरिकेचे फर्स्ट जंटलमन ठरु शकतात. अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे ते ज्यू पती आहेत.

Google's Top Trending Topics Kamala Harris Parents News in Marathi
कमला हॅरिस या त्यांच्या पतीसह (फोटो-गुगल ट्रेंड्स)

जो बायडेन यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे. मात्र कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जबाबदारीतून मुक्त होणं पसंत केलं. कमला हॅरिस आणि डग एमहॉफ यांचा विवाह २०१४ मध्ये झाला आहे. एमहॉफ याना एला आणि कोल ही दोन मुलं त्यांच्या आधीच्या पत्नीपासून झाली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माया हॅरिस कोण आहेत?

माया हॅरिस या कमला हॅरिस यांची बहीण आहेत. माझी बहीण कमला हिच्यातला लढाऊ बाणा मला कायमच आवडतो असं माया यांनी अनेकदा म्हटलं आहे. माया हॅरिस या पेशाने वकील आहेत. तसंच त्या लेखिका आणि वक्त्याही आहेत. त्यांनी २०२० मध्ये कमला हॅरिस जेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत होत्या तेव्हा त्यांचा प्रचार केला होता.