Happy Labour Day 2025 Wishes : दरवर्षी १ मे हा दिवस जगभरामध्ये जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन म्हणून हा दिवस ओळखला जातो. जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये या दिवशी कामगारांना सुट्टी दिली जाते. श्रमांच्या घामात भिजून प्रत्येक दिवसाचे कष्ट सार्थकी लावणाऱ्या प्रत्येक कामगाराला व प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या श्रमिक बांधवांना तुम्ही या खास दिवशी कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
काही हटके व सुंदर शुभेच्छा संदेश जाणून घेऊ या.

जो जीवंत ठेवतो कामाचे आगार, उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला खूम मोठा सलाम आहे.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
कामगार दिनाच्या शुभेच्छा!

कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा
बरसोत असो पावसाच्या ओल्याचिंब धारा तरी राबतो
आपला कामगार अन सर्जा राजा
कामगार दिनाच्या शुभेच्छा!

फक्त आजच नाही ते कायमच महत्त्वाचे आहेत.
समाजातील सर्व सन्माननीय कामगारांना…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कामगारांचा सन्मान करा
त्यांच्या कामाचा आदर करा.
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या शुभेच्छा

देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगतो जगासाठी आयुष्यभर, मायमातीचा आधार,
नाही कुणाचा लाचार,
माझ्या भूमितला कामगार.
कामगार दिनाच्या शुभेच्छा!

देशाच्या जडणघडणीत
मोलाचे योगदान देणाऱ्या श्रमिक बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

श्रमांच्या घामात भिजून जो प्रत्येक दिवसाचे कष्ट सार्थकी लावतो
त्या प्रत्येकाला कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा

कामगाराच्या घामाला मिळो योग्य तो दाम
त्यांच्या हाताला मिळो काम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवस हक्काचा
दिवस कामगारांचा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा