टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे एकीकडे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मात्र हे दर खूप फायदेशीर ठरत आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. याबाबतच्या अनेक बातम्या तुम्ही याआधी पाहिल्या असताली. अशातच आता कर्नाटकातून एक अशीच बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून एसयूव्ही कार खरेदी केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, टोमॅटो विकून लखपती बनला आहे. मात्र या शेतकऱ्याचे अजूनही लग्न झालेले नाही. त्यामुळ तो वधूच्या शोधात आहे.
कर्नाटकातील चामराजनगर तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश यांनी आपल्या १२ एकर शेतीत टोमॅटोचे पीक घेतले आहे. ज्यातून त्यांनी सुमारे ८०० पोती टोमॅटोची विक्री केली. टोमॅटोच्या भावात वाढ झाल्यामुळे त्यांना टोमॅटोच्या ८०० पोत्यांसाठी सुमारे ४० लाख रुपये मिळाले. या पैशातून राजेशने एसयूव्ही कार खरेदी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश म्हणाला की, टोमॅटोची किंमत अशीच वाढत राहिली तर आपण काही दिवसांत एक कोटी रुपये कमवू शकतो.
हेही वाचा- प्रेयसीला भेटण्यासाठी पिझ्झा घेऊन गेला तो परतलाच नाही, गच्चीवर गेलेला तरुण घाबरल्यामुळे थेट…
शेतकरी आहे नवरीच्या शोधात –
राजेश म्हणाला, आता माझ्याकडे चांगले पैसे आले आल्यामुळे मी सुखी आयुष्य जगू शकतो. तसेच आता मी नवरीच्या शोधात आहे. तो म्हणाला आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. शिवाय या आधीही लग्नासाठी मुलगी शोधत असताना सरकारी नोकरी नसल्यामुळे अनेकदा मला नाकारण्यात आल्याची खंत देखील त्याने व्यक्त केली आहे. तो म्हणाला, मुलीच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांना त्यांच्या मुलीचे लग्न सरकारी आणि कॉर्पोरेट नोकरी करणाऱ्या मुलांशी करायचे असते. मात्र, जर शेती योग्य पद्धतीने केली तर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता असंही तो म्हणाला. तसेच आता आपण एसयूव्हीमधून नवरी शोधणार असल्याचंही राजेशने सांगितलं.