मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त आयबी अधिकाऱ्याचा कारच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला असता हा अपघात नसून ठरवून केलेली हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय ही हत्या त्यांच्या शेजाऱ्याने केली असल्याचंही समोर आलं आहे.

आणखी वाचा- पुणे: खडकवासला धरणात कौटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या

म्हैसूरमधील निवृत्त आयबी अधिकारी आर.एन. कुलकर्णी हे ५ नोव्हेंबरला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असता मनसा गंगोत्रीजवळ त्यांना एका कारने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. दरम्यान, हा अपघाती मृत्यू असल्याचं सुरुवातीला सर्वांना वाटलं होतं.

आणखी वाचा- मुंबई: दाऊदशी संबंध असल्याच्या तक्रारीवरून ‘लिव्ह इन पार्टनर’ अटकेत; तपासात भलताच प्रकार उघड झाल्याने पोलीस चक्रावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आणि त्या फुटेजमुळे या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांना मिळालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक नंबर प्लेट नसणारी गाडी रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या कुलकर्णी यांच्या अंगावर जाणूनबुजून गाडी घालत असल्याचं दिसतं आहे. याच फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अधिकचा तपास केला असता ही हत्या मयत अधिकाऱ्यांच्या शेजाऱ्यानेच केल्याचं उघडकीस आलं आहे. तर शेजाऱ्याने हे कृत्य त्यांच्याशी असलेल्या प्रॉपर्टीच्या भांडणातून केल्याची माहिती आता समोर येत आहे.