Viral Video : बाहुबली हा प्रसिद्ध तमिळ चित्रपट आपल्याला माहिती असावा. या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटातील डायलॉग आणि पात्र खूप लोकप्रिय झाले होते. तुम्हाला या चित्रपटातील कटप्पा हे प्रसिद्ध पात्र आठवत असेलच. कटप्पा ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती आणि लोकांना खूप आवडली होती. आजही सोशल मीडियावर कटप्पावर अनेक मजेशीर व्हिडीओ, मिम्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कटप्पाच्या वेशभूषेत एक व्यक्ती बिनधास्त डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ढोल ताशाच्या तालावर कटप्पाच्या वेशभूषेत असलेला व्यक्ती तुफान नाचताना दिसत आहे. या कटप्पाबरोबर तरुणीसुद्धा नाचताना व्हिडीओत दिसते. ढोल ताशा वाजवणारे लोकं सुद्धा आदिवासी वेशभूषेत दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कटप्पा वेगवेगळ्या हटके डान्स स्टेप्स करतान दिसत आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून आनंद झाला” तर एका युजरने लिहिलेय, “कालाहंडीचा कटप्पा” आणि एका युजरने लिहिलेय, “कटप्पा खूप छान”

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

हेही वाचा : कला असावी तर अशी… बांगड्यांमध्ये खडे कसे लावतात? एकदा व्हिडीओ पाहाच

kalahandikattappa_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कालाहंडीचा कटप्पा, खूप मस्ती”
कालाहंडी हे ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात डान्स करतानाचा हा व्हिडीओ आहे. या डूप्लिकेट कटप्पाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कटप्पाने हटके डान्स करुन सर्वांना थक्क केले.