असं म्हणतात ,पहिला गुरु म्हणजे आई! लहानपणी कधी प्रेमाने तर कधी मार खाऊन आईने अभ्यास घेतल्याच्या अनेकांच्या आठवणी असतील. बहुतांश यशस्वी मंडळी यशाचं श्रेय आपल्या आईला देतात. पण अलीकडेच एका मुलाने आईला अभ्यासासाठी प्रेरित करून, त्या दोघांनी एकत्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धापरीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची सर्वत्र चर्चा आहे. एएनआयच्या माहितीनुसार केरळ मधील ४२ वर्षीय बिंदू व त्यांचा २४ वर्षीय मुलगा विवेक यांनी एकत्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेची तयारी करतानाही प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एकमेकांना साथ दिली आणि आता त्यांच्या मेहनतीला यशाची मोहोर लागली आहे. या मायलेकाची कहाणी जाणून घेऊया..

विवेक दहावीत शिकत असताना बिंदू यांनी आपल्याला मुलाचा अभ्यास घेता यावा यासाठी पुस्तकं वाचायला सुरुवाट केली, पण यातून त्यांनाच पुस्तकांची गोडी लागली.यापूर्वी त्यांनी दहा वर्ष अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम केले होते मात्र स्वतः परीक्षा देऊन मोठ्या पदावर काम करणे त्यांना शक्य होणार नव्हते. जे भूतकाळात जमले नाही ते आता करून दाखवायचं असं बिंदू यांनी मनाशी ठरवलं आणि लेकाच्या जोडीने त्यासुद्धा जोमाने अभ्यास करू लागल्या. विवेक आणि बिंदू दोघेही एकत्र ट्युशनला जाऊ लागले. यात वडिलांनी व शिक्षकांनी देखील खूप साथ दिल्याचे विवेक सांगतो.

मागील नऊ वर्षांपासून हे ही मायलेकाची जोडी अभ्यास करत होती. बिंदू सांगतात, घर व काम सर्व सांभाळून त्यांनी परीक्षेची तयारी केली. त्यांना सतत अभ्यास करणे शक्य नव्हते. अशावेळी परीक्षेच्या तारखेच्या सहा महिने आधीपासून त्या अभ्यासाला सुरुवात करत. त्यानंतर, तीन वर्षांनंतर परीक्षांच्या पुढील फेरीची घोषणा होईपर्यंत त्या विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायच्या. बिंदू यांनी लोअर डिव्हिजनल क्लर्क (LDC) परीक्षेमध्ये ३८वा रँक, तर लास्ट ग्रेड सर्व्हंट्स (LGS) परीक्षेत विवेकने ९२ वा रँक प्राप्त केला आहे.

असं काय झालं की आधी त्याने देवीसमोर जोडले हात आणि मग… Viral Video पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केरळमध्ये स्ट्रीम-2 पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्ष आहे, परंतु विशिष्ट श्रेणींसाठी सूट देण्यात येते. यात मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी तीन वर्ष तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विधवांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांसाठी शिथिलता देण्यात आली आहे.