सुशांत सिंग राजपूतने जगाचा निरोप घेतला असला तरी त्याच्या फिल्मी करिअरच्या माध्यमातून तो आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. सुशांत सिंगने फार कमी वेळात अशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, ज्यासाठी तो कायम स्मरणात राहील. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात लोक सुद्धा सुशांत सिंह राजपूतला विसरू शकले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या टांझानियातील तरूणाने एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये या टांझानियन तरूणाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर लिपसिंक केलंय. हा व्हिडीओ पाहून सुशांतचे फॅन भावूक होताना दिसून येत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

गेल्या काही दिवसांपासून टांझानियाच्या भाऊ-बहीणीच्या जोडीचा भारतात दबदबा कायम आहे. किली पॉल आणि त्याची बहीण नीमा यांचे हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, किली पॉलने आणखी एक नवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटातील ‘खैरियत’ या गाण्यावर हा व्हिडीओ बनवलाय. या गाण्यावर लिपसिंक करताना किली पॉलने जबरदस्त एक्सप्रेशन्सने या गाण्याचे भाव व्हिडीओमध्ये उतरवले आहेत. पण त्याची स्टाइलही जबरदस्त आहे. यामुळेच लोक त्याचे व्हिडीओ खूप पसंत करत आहेत. या गाण्यावर अभिनय किली पॉलने इतका सुंदर केलाय की, ते पाहून सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सच्या डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ एकदा पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरा नवरीची स्टेजवर थरारक एन्ट्री; झुल्याचा दोर तुटला, अन् १२ फूट उंचीवरून धाडकन कोसळले आणि मग…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आयुष्यात पहिल्यांदा कुत्रा पाहिला तेव्हा या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहा…तुम्ही सुद्धा प्रेमात पडाल

टांझानियातील तरूण किली पॉलने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. “खैरियत @arijitsingh आणि आमचे दिवंगत हिरो @sushantsinghrajput,” असं कॅप्शनमध्ये लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केलाय. सोबत त्याने कॅप्शनच्या शेवटी एक हार्ट इमोजी देखील वापरली आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल नेहमीप्रमाणेच त्याच्या पारंपरिक मसाई ड्रेसमध्ये दिसून आला आहे. सुशांतच्या या गाण्यातील शब्द न शब्द त्याने लिपसिंकमधून अत्यंत सुंदरपणे सादर केले आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाख ८३ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : प्रेम असावं तर असं…! कोंबडीला घेऊन जाणाऱ्या माणसासोबतच भिडला कोंबडा! पुढे काय झालं ते पाहाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तू खूप टॅलेंटेड आहेस, तुझे व्हिडिओ बघायला नेहमीच आवडतात,”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर आणखी एका दुसऱ्या युजरने त्याच्या लिपसिंकचं कौतुक करत लिहिलंय की, “तुला खूप शुभेच्छा. तुझे लिप सिंक व्हिडीओ फारच प्रशंसनीय असतात.” या व्हिडीओमधील त्याचे लिप सिंक पाहून तुम्हाला वाटणारंच नाही की तो दुसऱ्या देशाचा आहे. बॉलिवूडच्या गाण्यावर लिपसिंक करताना तो कुठेच गडबडत नाही. त्यामुळे भारतात किली पॉलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसून येतेय.